संजय गांधी निराधार योजना थकीत अनुदान रक्कम दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी नगरसेविका योजना पाटील यांचे प्रशासनाला साकडे..
भडगाव – तालुका प्रतिनिधी ( राजू दिक्षित )
तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत विधवा, दिव्यांग, जेष्ठ नागरिक इ. निराधारांसाठी असलेल्या श्रावण बाळ, इंदिरा गांधी, संजय गांधी योजनचे अनुदान 4 ते 5 महिन्यापासून थकीत आहे. दिवाळी सारखा सण 8 दिवसावर आहे. त्यामुळे निराधारांची दिवाळी अंधारातच जाणार की काय ? म्हणून अनुदान तात्काळ मिळावे तसेच थकीत अनुदान रक्कमही त्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती मा.अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील, शिवप्रेरणा अध्यक्षा मिना बाग, लाभार्थी सदस्य कल्पना वाघ, अरुणा भिल, दिपाली जाधव, संगीता भिल आदि महिला पदाधिकारी सदस्य यांनी तहसीलदार मुकेश हिवाळे यांना दिले. महीना अखेर अनुदान रक्कम लाभार्थी खात्यावर जमा होईल असे आश्वासन तहसीलदार यांनी दिले असल्याचे नगरसेविका योजना पाटील यांनी नमूद केले आहे.
__________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण भडगाव तालुक्यातील बातमी 9730002081 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
राजू दिक्षित
भडगाव तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9730002081