चांगले नगरसेवक निवडून आले तरी प्रत्यक्ष कारभार पाहणारे वेगळेच..यावल शहर जसे आहे तसेच आहे – अनिलभाऊ चौधरी.

यावल – प्रतिनिधी

जिल्हा परिषद आणि यावल नगरपरिषद निवडणूक संपूर्ण जागा आम्ही स्वबळावर स्वतंत्रपणे लढणार असल्याची तसेच यावल नगरपालिकेत चांगले सदस्य निवडून आले तरी प्रत्यक्ष कारभार पाहणारे मात्र वेगळेच असतात त्यामुळे यावल शहराचा गुणात्मक विकास झाला नाही यावल नगरपालिकेत अनेक विकास कामांमध्ये गैरप्रकार भ्रष्टाचार तसेच बोगस कामे झाली असल्यामुळे त्या कामांचा पाठपुरावा करून वेळेप्रसंगी संबंधितांवर फौजदारी किंवा दिवाणी गुन्हे सुद्धा दाखल केले जातील.आजही यावल शहर जसे आहे तसेच आहे विधानसभा निवडणुकीत आणि इतर विविध कार्यक्रमातून यावल शहरातून मला विशेष सहकार्य मिळाले आहे याचे उपकार विकास कामाच्या माध्यमातून फेडणार असल्याची माहिती जनशक्ती या लोकप्रिय प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तसेच रावेर विधानसभा मतदार संघातील भावी आमदार अनिलभाऊ चौधरी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितली.
येथील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की यावल नगर परिषद आणि जिल्हा परिषद जळगाव
सार्वत्रिक निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष पुर्ण ताकदनिशी सर्व जागा लढवणार आहे.
यावेळी त्यांनी यावल नगर परिषदेच्या अतिरिक्त साठवण तलावाच्या उभारणीत नियोजन करून झालेल्या गैरप्रकारास, भ्रष्टाचारास आपण शहरातील जनते समोर आणणार असल्याचे सांगुन प्रहारच्या हातात नगर परिषदची सत्ता आल्यास साठवण तलावात भ्रष्टाचार करणार्‍यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करू असे बोलुन यापुर्वी किती नगराध्यक्ष नगरपरिषदेत होवुन गेलेत मात्र खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर यावल शहराचा विकास झाला आहे का?यालाच अनुभवी नेतृत्व म्हणायचे का? असा प्रश्न उपस्थित केला.आपल्या यावल शहराच्या विकासाचे व्हिजन घेवुन प्रहार पक्ष हे निवडणुक लढवणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत यावलकर मंडळी अत्यंत गार्भीयांने विचार करून निर्णय घेतील.असेही पत्रकारांशी बोलतांना सांगीतले.
यावेळी पत्रकार परिषदेत नगर परिषदचे विद्यमान उपनगराध्यक्ष तसेच नगरपालिकेतील सक्रिय गटाचे समर्थक अभिमन्यु उर्फ हेंद्री विश्वनाथ चौधरी,माजी नगराध्यक्ष शशांकदादा देशपांडे यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगराध्यक्षा यांचे पती तथा माजी नगरसेवक व प्रहार पक्षाचे यावल शहराध्यक्ष तुकाराम बारी,प्रहार पक्ष अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष मोहम्मद शेख हकीम,प्रहारचे यावल रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख अलीम शेख,प्रहार अल्पसंख्यांकचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी हाकीम खाटीक,शेख शकील सर,यावल तालुका अध्यक्ष सुभाष सोनवणे,खलील शेख, रफीक टेलर,गोकुळ कोळी, नितिन कोळी,शेख निजाम,सागर चौधरी,तन्वीर मन्यार,युनुस खन्ना, उमर अली कच्छी आदी कार्यकर्ते मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

____________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!