आ.रोहीतदादा पवार यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री.गायके यांच्या कार्याचे केले कौतुक

धरणगांव (प्रतिनिधी):

राज्यातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत, कर्जत जामखेडचे कार्यसम्राट आमदार रोहीतदादा पवार मुक्ताईनगर दौऱ्यानिमित्त जामनेर येथे आले असता त्यांची प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा, प्रदीपराव गायके यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व पर्यावरण इ. विविध विषयांवर चर्चा झाली.
श्री. गायके गेल्या कित्येक वर्षांपासून सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक उपेक्षित, दुर्लक्षित घटकांसाठी निरंतर कार्य करीत, सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र कष्ट घेत असतात. कोरोना काळात प्रदीपराव गायके सरांनी मतदार संघातील व राज्यातील कोरोनाग्रस्त प्रतिनिधींच्या रुग्णांच्या सोईसाठी जिल्ह्यातील व राज्यातील हॉस्पिटलच्या संपर्कात राहून अनेकांना यथोचित मदत केली. त्यांनी केलेल्या मदतीचा बहुतेक रुग्णांना फायदा झाला आणि दिलासा मिळाला. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव झाल्यानंतर लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील कित्येक नागरीकांना भोजनाची, प्रवासाची व निवासाची सुविधा तसेच, मतदार संघात आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या आणि मास्क वाटप केले. श्री. गायके सर व त्यांची टीम प्रत्येकाला निसर्गनिर्मित ऑक्सिजन घेण्यासाठी गावाबाहेर निसर्ग व पर्यावरणाचा सानिध्यात राहून पायी चालावे, सायकलिंग करणे असा बहुमोल संदेश देत होते व आजही देत असतात. या माध्यमातून पर्यावरण आणि मानवी जीवन याचा सहसंबंध जाणून घेऊन, ‘आपले आरोग्य – आपल्या हाती’ असा मूलमंत्र ते सातत्याने देत राहतात
आजच्या या भेटीप्रसंगी रोहीतदादा पवार यांनी श्री. गायके यांना पायी व सायकल चालविण्याचे फायदे तसेच रोज किती चालतात याची विचारपूस केली. भेटीप्रसंगी जनशक्ती प्रहार पक्षाचे श्री. गायके हे सतत सर्वसामान्यांसाठी धावून येतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावपातळी, जिल्हापातळीवर अहोरात्र मेहनत घेणाऱ्या गायके सरांना रोहीत दादांनी कौतुकाची थाप दिली. त्याचप्रमाणे समाजासाठी कार्य करताना स्वतःचीही काळजी घ्यावी, असा बहुमोल सल्ला देखील आमदार रोहीतदादा पवार यांनी दिला. यावेळी आमदार रोहितदादा पवार, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीपराव गायके, राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड, योग तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, राष्ट्रवादी वकील सेल जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरसे, विधानसभा क्षेत्र किशोर पाटील, ओबीसी सेल शहराध्यक्ष प्रभू झाल्टे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!