भडगाव तालुक्यातील अंजनविहिरे गावात शेतकऱ्यांसाठी कीड नियंत्रणा बाबत केले मार्गदर्शन….
भडगाव – तालुका प्रतिनिधी ( राजू दिक्षित )
मराठा विद्याप्रसारक समाज संस्था संचालित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील. कृषी महाविद्यालय ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत अंजंविहिरे कृषी कन्या ने शेतकऱ्यांसाठी थेट शेतात जाऊन कापसावरील कीड नयंत्रणाबाबत मार्गदर्शन केले . कार्यक्रमांतर्गत हर्षा पाटील हिने कापूस पिकावरील प्रमुख समस्या समजल्या जाणाऱ्या अमेरिकण बोड अळी , गुलाबी बोड अळी तसेच मावा, पांढरीमाशी यावर जैविक, रासायनिक, तसेच पारंपरिक पद्धतीने कसे नियंत्रण करावे याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळी गावातील बरेचसे शेतकरी उपस्थित होते . कृषी महाविद्यालयाचे प्राचर्य. डॉ. आय. बी. चव्हाण. प्रा. एस. यू. सूर्यवंशी. प्रा . डॉ. ए. यू. कानडे. प्रा. एस . बी .सातपुते. प्रा. डॉ. के. के. सूर्यवंशी. प्रा. डॉ.डी.एस. शिंदे .यांचे मार्गदर्शन लाभले.
_______________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण भडगाव तालुक्यातील बातमी 9730002081 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
राजू दिक्षित
भडगाव तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9730002081