पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2020-21 अंतर्गत केळी,डाळिंब,मोसंबी, फळपिक (अंबिया बहार) विमा नुकसान भरपाईची रक्कम मंजूर….
खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश.
जळगाव जिल्ह्यातील 12847 पात्र शेतकऱ्यांना मिळणार रु.28कोटी 03लाख 62, हजार 346/- ची नुकसान भरपाई
मंजूर झालेल्या विम्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा
ऐन दिवाळीत मदत मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा,
जळगाव : –
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2020-21 अंतर्गत अंबिया बहारामध्ये जळगाव जिल्ह्यातील केळी,डाळिंब,मोसंबी या फळपिकांचा विमा शेतकऱ्यांनी काढलेला होता. या अनुषंगाने खासदार उन्मेश दादा पाटील यांनी मा. सचिव (कृषि) महाराष्ट्र राज्य मुंबई यांना विमा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तात्काळ विम्याची मंजूर रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याबाबत दिनांक – 07 ऑक्टोबर 2021 रोजी पत्राद्वारे मागणी केली होती. त्या अनुषंगाने संबंधित विमा कंपनीमार्फत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील 12847 पात्र विमाधारक शेतकऱ्यांना रु. 28,03,62,346/- ( अठ्ठावीस कोटी तीन लाख बासष्ट हजार तीनशे शेहचाळीस रुपये मात्र) रक्कम मंजूर झालेली असून लवकरच सदरील रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा असून खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या भक्कम पाठपुराव्याला यश आले आहे.
रक्कम पात्र लाभार्थी तालुका व पिकनिहाय खलील प्रमाणे आहे.
भडगाव
51 शेतकरी रू.5,09,924/-
चाळीसगाव
12 शेतकरी रू.4,42,395/-
धरणगाव
34 शेतकरी रू.5,78,685/-
एरंडोल
5 शेतकरी रू.1,02,242/-
जळगाव
3411 शेतकरी रू.6,96,34,431/-
पाचोरा
245 शेतकरी रू.58,21,761/-
पारोळा
2 शेतकरी रू.5700/-
रावेर
2969शेतकरी रू.6,08,27,512/-
मुक्ताईनगर
1633 शेतकरी रू.4,54,86,945/-
जामनेर
44 शेतकरी रू.10,45,372/-
चोपडा
1364 शेतकरी रू.2,77,59,165/
भुसावळ
18 शेतकरी रू.3,90,225/-
बोदवड
18 शेतकरी रु.2,61,900/-
यावल
3041 शेतकरी रू.6,74,96,089/-
ऐन दिवाळीत मदत मंजूर
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी याबाबत सात्यत्याने पाठपुरावा करीत अनेकदा दूरध्वनीवरून अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसान भरपाई द्यावी असे आदेश वजा विनंती केली होती. ही मागणी लावून धरल्याने अखेर विम्याची मंजूर रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा आहे.गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आधीच शेतकरी बांधवांचे आर्थिक कंबरडे मोडले असताना ही मदत मिळाल्याने शेतकरी बांधवांना ऐन दिवाळीत नुकसान भरपाई मंजूर झाल्याने दिलासा मिळणार आहे. मदत मंजुरीसाठी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला. यामुळे मदतीला मंजुरी मिळाल्याबद्दल नुकसानधारक शेतकऱ्यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आभार मानले आहेत.