पाल येथील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात मास्क, सॅनीटायझर व गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत.
रावेर तालुका प्रतिनिधी:- (प्रदीप महाराज)
महाराष्ट्र शासन व क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी दिलेल्या नियमावलीचा वापर करून दि :-२०-१०-२०२१ रोजी पाल ता. रावेर येथील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय प्रत्यक्ष सुरु करण्यात आले. यावेळी कोव्हीड १९ च्या प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मास्क, सॅनीटायझर व गुलाब पुष्प देऊन प्रभारी प्राचार्य हितेश फिरके यांनी स्वागत केले. त्याच प्रमाणे कोव्हीड -१९ ला प्रतिबंध,म्हणजेच हँड वॉश, मास्क, सॅनीटायझर व सोशल डीस्टसिंग अश्या आरोग्य विषयक बाबींचे मार्गदर्शन करीत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. शरद वाणी, प्रा डॉ. अमोल पाटील, प्रा. आरिफ तडवी, प्रा. दीपक भुसे, प्रा. प्रदीप खैरे, प्रा. आशिष जहुरे, श्री. राजू नाथ तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर तालुक्यातील बातमी 7887987888 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
प्रदीप महाराज
रावेर तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-7887987888