शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात अर्धातास बैठक, काय झाली चर्चा?

मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज दुपारी राष्ट्रवादी काँग-ेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. या बैठकीत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी राजकीय चर्चा केल्याची माहीती समोर येत आहे. सोमवारी सह्याद्री अतिथिगृहात या दोन्ही नेत्यांची भेटही झाली होती. मात्र त्यावेळी उपस्थित असलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांमुळे राजकीय संवाद साधता आला नाही. त्यामुळे आज ही भेट झाल्याचं बोललं जातंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जवळपास अर्धातास चर्चा झाली.

यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बारामतीमधील ळपर्पेींरींळेप ीलळशपींळषळल ीशीशरीलह ळपीींर्ळीीींंश च्या उदघाटन सोहळ्याचं निमंत्रणही दिलं. या संस्थेचं उद्धघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच करण्यात येणार आहे. त्याची कार्यक्रम पत्रिका देण्यासाठीही शरद पवार मुख्यमंत्री यांना भेटायला गेले होते.

दोन दिवसांपूर्वीही शररद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठक झाली होती. त्या बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानानबाबत शेतकर्‍यांना मदत, कोविड निर्बंध हटविण्याच्या संदर्भात चर्चा तसेच कोविडमुळे संकटात आलेल्या अवजड वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी अवजड वाहनांवरील वाहतूक कर कमी करण्याच्या संदर्भात चर्चा झाली होती.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आज सकाळीच दिल्लीत नितीन गडकरींची भेट घेतली. नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कोकणातील प्रलंबित रस्ते आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या संबंदित प्रश्नांवर चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. संगमेश्वर लांजा या रस्याचे काम रखडले आहे त्याबद्दल ही भेट झाली असल्याचं विनायक राऊत यांनी सांगितलं. म्हैसकरांच्या कंपनीने हे काम केलेलेच नाही. त्यामुळे चांगले कंत्राटदार नेमण्याची मागणी यावळे त्यांनी केली. तसेच ठेकदारांचे 58 कोटींची थकबाकी देण्याची मागणीही करण्यात आली. मराठी खासदारांसाठी हक्काचे स्थान हे गडकरींचे निवासस्थान असल्याचंही त्यांनी म्हटलं. चिपी विमानतळामुळे सिंधुदुर्ग विमानसेवा चांगल्या पद्धतीने सुरू झाली आहे. फक्त कुडाळ ते एअरपोर्ट हा मार्गही? लवकरच पूर्ण होईल असा विश्वासही यावेळी विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!