म.रा.वि.वि.महामंडळ ओझर उपअभियंता योगेश्वर पाटील यांना अन्याय आत्याचार निर्मुलन समितीचे निवेदन…!

ओझर प्रतिनिधी (जुबेर शेख)

ओझर (मिग) येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अधीकारी श्री.पाटील साहेब यांना अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे शिष्टमंडळाने भेट घेऊन ओझर स्ट्रीट लाईट कनेक्शन कायम सुरु ठेवावे तसेच ओझर येथील गरीब व गरजु ग्राहक यांना लाॅकडाऊन कालावधीत जादा आलेले लाईट बिल कमी करून ज्यांचे विज कनेक्शन कट केले त्यांचे कनेक्शन त्वरीत जोडणी करुन द्यावे व जादा विज बिल आलेल्या नागरीकांना हप्ते करून देण्यात यावे या मागणीचे निवेदन मा.रविंद्रदादा जाधव यांचे नेतृत्वाखाली देण्यात आले.
या शिष्टमंडळात उपस्थित इकबाल अब्दुल खाटिक व विजय सोनवणे,तौसिफ जाकिर पठाण. यांचे बिल कमी करुन उर्वरित बिलाचे हप्ते करुन देण्यात आले. या शिष्टमंडळात तालुका अध्यक्ष शशीभाऊ जाधव, ओझरशहर अध्यक्ष राजाभाऊ सोनवणे,तालुका संघटक शब्बीरभाई, तालुका संघटक उत्तम जाधव, तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष जाफर पठाण, तौसिफ पठाण, आसिफ सर, अल्सम शेख, घनश्याम जाधव, आदी. उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!