राम कदम यांची आर्यन खानला जामीन मिळावा यासाठी प्रार्थना

मुंबई

क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. 2 ऑॅक्टोबरला आर्यन खानला क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणी अटक करण्यात आली होती. तो सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. जामिनावरील निर्णय आर्यनच्या जामिनावर सुनावणी करणार्‍या विशेष एनडीपीएस न्यायालयाने गेल्या सुनावणीत राखून ठेवला होता. दरम्यान आज सुनावणी होणार असल्यामुळे टिवट करत भाजप नेते राम कदम यांनी प्रार्थना केली आहे.

आपल्या टिवटमध्ये राम कदम यांनी म्हटले आहे की, प्रार्थना आहे की आज आर्यन खानला जामीन मिळावा. संविधान अन् कायद्याप्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे. त्याचबरोबर यावेळी राम कदम यांनी ठाकरे सरकारवरही टीका केली आहे. ही लढाई कोणा एक व्यक्ती विशेषच्या विरोधातील लढाई नाही, अखंड मानवजातीची ड्रग्सविरोधी लढाई आहे. अपेक्षा होती महाराष्ट्र सरकार निदान या खतरनाक ड्रग्स प्रकरणात ड्रग्स माफियाच्या विरोधात उभे राहतील. पण वसूलीचा प्रभाव स्पष्ट दिसला, असे राम कदम म्हणाले आहेत.

महबूबा मुफ्ती यांनीदेखील याचा आगामी निवडणुकीसाठी पुरेपूर उपयोग केला. जी ड्रग्सची नशा आपल्या सर्व युवकांना बरबाद करू शकते त्याविरोधात सर्व पक्ष आणि मानवजात एकत्र का येऊ शकत नाहीत. हे दु:ख आहे, अशी खंत देखील राम कदम यांनी आपल्या दुसर्‍या टिवटमध्ये व्यक्त केली आहे.

आता बदललेल्या भारतात कोणी श्रीमंत गरीब, नेता, अभिनेता असोष्ठकायद्याच्या समोर सर्वे समान आहेत. भविष्यात आर्यनने ज्या ड्रग्सचा कलंक त्याच्या बदनामीचे कारण झाले, त्या ड्रग्सविरोधात प्रखर लढाई उभी करून युवकांना ड्रग्सपासून दूर करण्यासाठी काम करून संकटाचे संधीत रूपांतर करण्यासाठी एक देशवासी या नात्याने शुभेच्छा, असेही राम कदम म्हणाले आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!