अभाविप तर्फे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया समोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूस गतिरोधक टाकण्यासाठी बांधकाम विभाग अधिकार्यांना निवेदन
धरणगाव (प्रतिनिधी)-
शहरातील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या समोरील धरणगाव – जळगाव रस्त्यावर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर गतिरोधक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे व त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा विचार करता महाविद्यालयाच्या काही अंतरावर गतिरोधक असणे आवश्यक आहे.
शहरात एकच महाविद्यालय असल्यामुळे ग्रामीण भागातील व शहरातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते, अश्या परिस्थितीत रस्त्यावरून जाणारे वाहने सुसाट वेगाने जातात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे, तरी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता पुढील आठ ते दहा दिवसात गतिरोधक बनवण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धरणगाव शाखेकडून करण्यात आली.
यावेळी अभाविप जिल्हा संयोजक इच्छेश काबरा, शहरमंत्री आर्यन सैंदाणे, अक्षय वाणी, मोरेश्वर महाले, विवेक महाले, भुषण तडेराव कार्यकर्ते उपस्थित होते.