कसोटी : भारताच्या स्नेह राणाचे पदार्पण कसोटीत शानदार प्रदर्शन, आपल्या वडिलांचे स्वप्न केले पूर्ण

बिस्टल,17जून

इंग्लंड महिला क्रिकेट संघा विरुध्द येथे खेळण्यात येत असलेल्या एकमेव कसोटी सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी भारतीय महिला संघातील ऑफ स्पिनर स्नेह राणाने आपल्या शानदार प्रदर्शनाला आपल्या वडिलांना समर्पित केले आहे. तिच्या वडिलांचे दोन महिन्यापूर्वीच निधन झाले होते.

भारतीय फिरकी गोलंदाज स्नेहा राणाने कसोटी सामन्यांच्या पहिल्याच दिवशी इंग्लंंडच्या तीन गडीना बाद करुन भारताची सामन्यातील वापसीमध्ये महत्वाची भूमिका निभावली.

स्नेहाने म्हटले की मी माझ्या वडिलांना दोन महिन्यापूर्वी गमविले होते आणि संघ घोषीत होण्याच्या ठिक आधी त्यांचे निधन झाले होते. हा खूप कठिण आणि भावुक क्षण आहे कारण माझे वडिल मला भारतासाठी खेळताना पाहू इच्छित होते. दुर्भाग्यपणे ते आमच्या बरोबर नाहीत परंतु हा जीवनाचा भाग आहे.

तिने म्हटले की मी जखमी असल्याच्या कारणामुळे एका वर्ष क्रिकेट पासून लांब होते परंतु मी घरगुती क्रिकेट खेळले आणि तेथे प्रदर्शन केले. मी पुनर्गमन करु शकले यासाठी आभारी आहे.

तिने म्हटले की सामन्याच्या आधी ज्यावेळी संघाची बैठक झाली त्यावेळी मला माहिती पडले की मी एकादशमध्ये सामिल आहे. मी प्रशिक्षक आणि कर्णधारा बरोबर बोलणे केले आणि कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे यावर चर्चा केली.

स्नेहाने म्हटले की भारताला फायदा आहे कारण आम्ही या सामन्यात विना कोणत्याही दबावाचे खेळत आहोत आणि संघाकडे गमविण्या सारखे काहीही नाही.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!