तांदलवाडी साने गुरुजी जेष्ठ नागरीक मंडळातर्फे ५० जेष्ठ नागरीकांची आरोग्य तपासणी
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जेष्ठ नागरिक भवनात विविध कार्यक्रम संपन्न
तांदलवाडी- (प्रतिनिधी),
येथील साने गुरुजी जेष्ठ नागरीक मंडळातर्फे मंगळवार दि.१९ रोजी ५० जेष्ठ नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.वैद्यकीय अधिकारी डॉ.सारंग पाटील यांनी जेष्ठ नागरीकांची तपासणी केली.यावेळी जागतिक स्तरावर बुकी,व जलतरण स्पर्धेत गावाचे नावलौकिक वाढविणारे शिक्षक कुलदीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला, मंडळातर्फे यावेळी तीन बाकांचे लोकार्पणही करण्यात आले.रात्री कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जेष्ठ नागरिक भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिवनेरी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला.त्यानंतर दूध वाटपाचा कार्यक्रमही झाला.अध्यक्ष स्थानी माजी आमदार राजाराम महाजन होते तर सुरेश पाटील यांच्या हस्ते दुध वाटपाचा कार्यक्रम झाला.यशस्वीतेसाठी पंडीत चौधरी, डॉ.प्रकाश पाटील, डॉ. सुरेश तायडे, वसंत गायकवाड, भागवत चौधरी, विश्वनाथ चौधरी,सुधाकर चौधरी आदींनी सहकार्य केले.कार्यक्रमास १०० जेष्ठ नागरिक सभासद उपस्थित होते.