नारीदीप सन्मान 2021 पुरस्कार व पर्यावरण मित्र पुरस्कार सौ नयना निलेश पाटील यांना प्रदान…
रावेर शहर प्रतिनीधी ( ईश्वर महाजन )
रावेर शहरातील आदर्श शिक्षक व तसेच सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या सौं. नयना निलेश पाटील प्राचार्या किलबिल अकॅडमी रावेर प्रापंचिक जबाबदारी सांभाळून विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान देवगिरी प्रांत च्या विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत; गेल्या नऊ वर्षात विद्याभारती च्या विविध आयांमाच्या प्रमुख सद्यस्थितीत शिशु वाटिका शोध या विषयात कार्यरत. बालिका शिक्षण हा आवडीचा विषय!
गेल्या नऊ वर्ष पासुन अविरत पणे शैक्षणिक विषयात मातृभाषेतून शिक्षण देत आहे. विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान देवगिरी प्रांत संलग्नित पूर्व प्राथमिक शाळा पंचक्रोशीतील आदर्श शाळा ; सोबतच निसर्ग व सामाजिक प्रदूषण निवारण मंडळ ,महाराष्ट्र महिला सखी मंच जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे.
यशवंत प्रतिष्ठान संचलित वसुधा पर्यावरण सखीमंच महाराष्ट्र अध्यक्षा म्हणून जबाबदारी आहे
गेल्या अनेक वर्षा पासुन शाळेत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुलांना एक मूल एक झाड असे उपक्रम राबवित मुलांन कडून ते रोप लावून त्याला त्याची संवर्धन चीं जबाबदारी दिली जाते, कुटुंबातील आजी-आजोबांसोबत पाल्यांनी रोप लावून त्याचा फोटो शाळेत समूहावर पाठवावा वर्षभरातून तीन वेळेस शिक्षकांकडून झाडाचे अवलोकन करण्यात येते. तसेच मुलांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण संकल्पना.
सीड बॉल्स तयार करणे,गणपती व दुर्गा उत्सवात निर्माल्य संकलन करणे, जमा झालेल्या निर्माल्यातून वर्षभर कुजवून त्यातून खत निर्मिती करणे व परिसरातील वृक्षांना ते उपलब्ध करून देणे,
मातीच्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करणे ,मातीच्या गणपती मूर्ती ची उपलब्धता करून देणे.थोडक्यात पर्यावरण पूरक गणेश उत्सव तसेच सर्वच उत्सव हे पर्यावरण पूरक असावे याचा सवैज्ञानिक
महिलांना एकत्र करून स्वयं रोजगार आरोग्य जनजागृती माहिती करून देणे, कार्यक्रम वेळोवेळी कौटुंबिक एकत्रीकरण सबलीकरण आग्रह आगामी काळात यशवंत क्रीडा मंडळ रावेर यामार्फत मुलींना व महिलांना स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हा मानस आहे.
कपडा बँक उपक्रम
वनवासी भागातील व सेवावस्तीतील गरजू, निराधार महिलांना व गरजू व्यक्तींना यशवंत प्रतिष्ठान,रावेर व संचलित किलबिल अकॅडमी च्या माध्यमातून जुने कपडे स्वच्छ धुऊन व प्रेस करून दिले जातात.
‘दिवाळी निमित्त फराळ चे संकलन वाटप
खदान व वीट भट्टी कामगार तसेच काही शेत मंजूराच्या लहान मुलांना दिवाळीचा संकलित फराळ वाटप केला जातो.
विविध भागात वृक्षारोपण
शहरातील मोकळा जागेत विशेष पुढाकार घेऊन वृक्षारोपण करून त्याची संवर्धन केले जाते (मोफत रोपांची उपलब्द्धता करून देण खदान वर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी महिन्यातून एकदा बाल संस्कार केंद्राचे व्यवस्थापन
असे विविध कार्यक्रम यशवंत प्रतिष्ठान , रावेर मार्फत करत आहेत यापूर्वीही तरुण भारत तर्फे किलबिल अकॅडमी रावेर यांना सेवाव्रत पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे
सौं. नयना निलेश पाटील यांना
शैक्षिक आगाज भारत ,गौरव सोहळा महाराष्ट्र यांच्या माध्यमातून पर्यावरण मित्र पुरस्कार जनार्दनहरी महाराज वढोदा यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच नारीदिप सन्मान 2021 पुरस्कार जळगाव महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते सौं.नयना निलेश पाटील यांना देण्यात आला.
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832