निंभोरा बु. येथे आजपासून श्रीराम मंदिरात काकडा आरतीला सुरुवात
निंभोरा बु (प्रमोद कोंडे.9922358586)
रावेर तालुक्यातील निंभोरा बु. येथे शेकडो वर्षांपासून सुरु असलेल्या कार्तिक महिन्यातील काकडाआरती उपक्रमाला श्रीराम मंदिरात आजपासून सुरुवात होत आहे.परंपरेनुसार यंदा 20. ऑक्टोबर ते 19. नोव्हेंबर दरम्यान दररोज पहाटे 5. वाजेपासून 6:30. वाजेपर्यंत काकडा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.तरी जास्तीत जास्त भाविकांनी काकडा आरतीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर ट्रस्ट अध्यक्ष अनिल बऱ्हाटे,वाल्मिक पवार, प्रल्हाद भाऊ बोंडे, कैलास महाजन, घमा भंगाळे, मनोहर वाणी, गिरधर ब-हाटे, रमेश येवले, काशीनाथ ब-हाटे,गिरधर भंगाळे,सिताराम ढाके, बंडुनाना पवार, संजय भंगाळे,बाळु दोडके, अतुल गोराडकर, अशोक पाटील, प्रमोद बोरोले,प्रकाश ब-हाटे, नथ्थु गोराडकर, भागवत बखाल, भालचंद्र कोळंबे, गंभीर कोळंबे यांनी केले आहे.शेवटी गावातून दिंडी सोहळा काढण्यात येतो. ही शेकडो वर्षाची परंपरा आजही कायम आहे.