विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा; दुबईच्या मादाम तुसा संग-हालयात मेणाचा पुतळा

दुबई,

भारतीय संघ टी 20 वर्ल्ड कपला सामोरं जात असताना कर्णधार विराट कोहलीचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला आहे. दुबईच्या मादाम तुसा संग-हालयात विराट कोहलीचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. सोशल मीडियावर या गोष्टीची चांगलीच चर्चा रंगली आहे. विराट कोहलीचा हा दुसरा पुतळा असून या आधी लंडनच्या लॉर्ड क्रिकेट स्टेडिअमवर त्याचा पहिल्यांदा मेणाचा पुतळा उभा करण्यात आला होता.

दुबईमध्ये मादाम तुसा संग-हालयाचं गेल्याच आठवड्यात उद्घाटन करण्यात आलं आहे. या संग-हालयात विराट कोहलीसह इंग्लंडची राणी, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहॅम, अ‍ॅक्शन स्टार जॅकी चेन, फुटबॉलपटू मेस्सी, टॉम क्रुझ , पॉप स्टार रिहाना यांच्या आणि इतर 60 लोकांच्या पुतळ्याचा समावेश आहे.

दरम्यान, आयपीएलनंतर आता टी20 विश्वचषकाचा महासंग-ाम सुरु झाला आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या फेरीला सुरुवात होण्यापूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारताने इंग्लंडवर 7 विकेटनी मात केली आहे. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या इंग्लडने भारताला 20 षटकात 189 धावांचे आव्हान दिलं होतं. भारताने तीन विकेट गमावत 19 षटकात 189 धावा केल्या आणि इंग्लंडवर मात केली. भारताकडून ईशान किशनने सर्वात चांगली कामगिरी केली. ईशाननंतर भारताकडून राहुलने अर्धशतकी खेळी केली आहे. ईशान आणि राहुलने दिलेल्या योगदानामुळे भारताला हा विजय मिळवून दिला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली याने या सामन्यात काही खास प्रदर्शन करु शकला नाही.

दरम्यान, टीम इंडिया या स्पर्धेची सुरुवात 24 ऑॅक्टोबरपासून करणार आहे. या स्पर्धेचा पहिल्याच सामन्यात टीम इंडिया पाकिस्तानसोबत भिडणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!