उन्हाळी पावसाची टंचाई विषयी कृषिमंत्र्याना दिले निवेदन
सुरगाणा प्रतिनिधी- (एकनाथ शिंदे)
सुरगाणा तालुक्यातील गोंदूने जी.प गटातील ग्रामपंचायती व ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट गावांना उन्हाळ्यात होणाऱ्या भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन,ग्रामस्थांनी आतापर्यंत वेळोवेळी शासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देऊन ही आतापर्यंत कुठल्याही प्रकारची दख्खल न घेतल्याने ग्रामस्थांना विशेष करून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट,रात्रभर झोपमोड करून हंडाभर पाण्यासाठी केले जाणारे जागरण,होणारा मानसिक त्रास लक्ष्यात घेता,गोंदूने गटातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उन्हाळ्यापूर्वीच कृषिमंत्रीची भेट घेऊन दिले निवेदन.जेणेकरून उन्हाळ्यापर्यंत त्याची अंमलबजावणी होऊन ग्रामस्थांना त्याचा उपयोग होईल.गोंदूने जी.प.गटातील गावांना मिशन जल जीवन योजने अंतर्गत पाणीपुरवठा मंजूर झाल्यास अनेक वर्षांपासून असलेली पाणीटंचाई दूर होईल.याची दख्खल तात्काळ शासनस्तरावर लवकरात लवकर घेऊन ग्रामस्थांची होणारी गैरसोय टाळावी यासाठी,गोंदूने गटातील शिष्टमंडळाने कृषिमंत्रीना दिले निवेदन.तसेच तोक्ते चक्रीवादळामुळे आंबे नुकसानभरपाई पासून खरे लाभार्थी डावलून,अद्यापही कुठलीही नुकसानभरपाई न मिळालेले वंचित शेतकऱ्यांवर अन्याय करणारे शासकीय अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी,अशा विविध मागण्यांसाठी कृषिमंत्री मा.दादा भुसे साहेबांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सुरगाणा शिवसेना तालुकाप्रमुख मोहनराव गांगुर्डे साहेब,उंबरठाण ग्रामपंचायत सदस्य माधव शेट पवार,म्हैसखडक चे तरुण उद्योजक तुकाराम शेट देशमुख,खुंटविहिर ग्रामपंचायत सदस्य गोविंद महाले,जामुनपाडाचे रोहिदास चौधरी, आंबाठा येथील यशवंत कोल्हे,गाळबारी येथील रघुनाथ गावित,चुली येथील तुळशीराम बागुल,दातरीचापाडा येथील यशवंत राऊत,चिंचला,चंद्रपूर येथील शांताराम महाले,उमेश पालवा, चंदू बागुल,सोनू ठाकरे,मोहन गावित, अरुण सहारे,गुही येथील सहारे काका, आदी.सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.