जपानच्या दिशेने उत्तर कोरियाने डागले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र

सियोल,

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने निर्बंध लादले असतानाही, आपला आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम उत्तर कोरियाने पुढे चालू ठेवला आहे. दक्षिण कोरियाच्या ज्वॉइंट चीफ्स ऑॅफ स्टाफचा हवाला देत उत्तर कोरियाने जपानच्या समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत आमची सहयोगी वेबसाइट थखजछ मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियन लष्कराने यापूर्वीही म्हटले होते की, जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाने अज्ञात क्षेपणास्त्र डागले आहे. परंतु त्याच्याशी संबंधित अधिक माहिती उघड होऊ शकलेली नाही. मागील काही काळापासून उत्तर कोरिया क्षेपणास्त्र चाचण्या घेत आहे. पण संयुक्त राष्ट्राने उत्तर कोरियावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रांच्या चाचणीसाठी निर्बंध लादले आहेत.

जपान सरकार असे गृहीत धरत आहे की, उत्तर कोरियाने डागलेले क्षेपणास्त्र बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असू शकते. आता धोका लक्षात घेता, जपानी तटरक्षक दलाने जहाजांना संभाव्य चाचणीसाठीचा इशारा दिला आहे. जपानी तटरक्षक दलाने सागरी सुरक्षेचा इशारा जारी केला आहे. पण, कोणत्या लक्ष्यावर हे क्षेपणास्त्र डागण्यात आले हे स्पष्ट झालेले नाही. त्याचवेळी, अलीकडेच, जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी जपानचे संरक्षण बजेट वाढवून सुरक्षा क्षमता वाढवण्याच्या गरजेवर भर देण्याचे सांगितले होते. दक्षिण कोरियाच्या अध्यक्षीय कार्यालयाने क्षेपणास्त्र प्रक्षेपणावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक आयोजित केली आहे. उत्तर कोरियाने शांततेच्या एक महिन्यानंतर पुन्हा एकदा अण्वस्त्र चाचण्या सुरू केल्या आहेत.

येत्या काही दिवसांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे उत्तर कोरियाचे विशेष दूत सुंग किम सियोलमध्ये अमेरिकन मित्र राष्ट्रांशी भेटून उत्तर कोरियाशी चर्चा पुन्हा सुरू करण्याच्या शक्यतेवर चर्चा करतील. वॉशिंग्टन आणि प्योंगयांग यांच्यातील आण्विक चर्चा दोन वर्षांहून अधिक काळ रखडली आहे. उत्तर कोरियाने अटींशिवाय चर्चा सुरू करण्यासाठी बायडेन प्रशासनाचा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला आहे. उत्तर कोरियाच्या वतीने असे म्हटले गेले आहे की, अमेरिकेने आधी आपले शत्रुत्व धोरण सोडले पाहिजे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!