उपविभागीय दंडाधिकारी पीयुष रोहणकर यांची सदिच्छा भेट
नवी दिल्ली,
नवी दिल्ली जिल्हयाच्या छावनी भागाचे उपविभागीय दंडाधिकारी पियुष रोहणकर यांची आज महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी सदिच्छा भेट घेतली
येथील जामनगर हाऊस मध्ये श्रीमती अरोरा यांनी श्री रोहणकर यांची भेट घेतली व त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. कार्यालयाची परिचय पुस्तिका तसेच महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र ‘लोकराज्य’ अंकही भेट दिले. यावेळी झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये श्रीमती अरोरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या विविध उपक्रमांची व कार्याची माहिती दिली तसेच श्री राहेणकर यांनी प्रशासकीय सेवेत राबविलेल्या वैविद्यपूर्ण उपक्रमांची व प्रकल्पांची माहिती दिली.
श्री रोहणकर हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2014 तुकडीचे (दानिक्स) अधिकारी असून ते उत्तम लेखकही आहेत. त्यांची एकूण तीन कविता संग-ह आणि दोन स्पुट संग-ह प्रकाशित आहेत. श्री रोहणकर यांनी ‘एक खअड ईळिीरपीं की रोमांचक सक्सेस स्टोरी’ आणि मअ झश्रशरीरपीं एीलरशिफ ही स्वलिखित पुस्तके श्रीमती अरोरा यांच्याकडे महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ग-ंथालयासाठी भेट स्वरूपात दिले.