विमान इंधनापेक्षाही पेट्रोल महागण्यावरुन राहुल गांधीचा सरकारवर निशाना
नवी दिल्ली,
देशात विमान इंधनापेक्षा पेट्रोल महाग होणे हा एक गंभीर मुद्दा आहे कारण लोक कल्याणाचा मुद्दा सर्वांत पहिले येतो आणि लोकांच्या दैनिक आवश्यकेता त्यांच्या पोहचच्या बाहेर होत आहेत. परंतु पंतप्रधानांच्या काही मित्राना लाभ पोहचविण्यासाठी जनतेला धोका दिला जात आहे आणि मी लोकां बरोबर उभा आहे असे मत काँग-ेसचे नेते राहुल गांधीनी सोमवारी टिवीटरवरुन व्यक्त केले.
देशामध्ये विमान इंधनापेक्षा पेट्रोल महाग झाल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर काँग-ेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीनी केंद्र सरकारवर निशाना साधला आहे. राहुल गांधीनी आपल्या टिवीट बरोबर एक बातमीही टॅग केली.
रविवारी इंधनाच्या किंमतीमधील वाढीनंतर पेट्रोलची किंमत विमान इंधनापेक्षा जवळपास 33 टक्क्याने वाढली आहे. दिल्लीमध्ये एटीएफच्या किंमती 79,020.16 रुपये प्रति किलोलीटर किंवा 79 रुपये प्रति लीटर आहेत. तर दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत 105.84 रुपये आहे.
काँग-ेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रानी सरकारवर टिका करत म्हटले की सरकारने आश्वासन दिले होते की सामान्य लोक चप्पलसह विमानात बसून प्रवास करतील परंतु स्थिती ही आहे की मध्यम वर्ग आणि गरीब पीडित आहेत आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीच्या कारणामुळे रस्त्यावरुनही प्रवास करण्यात असमर्थ आहेत.
पेट्रोल व डिझेलच्या किंमती सलग चार दिवस वाढल्यानंतर सोमवारी अपरिवर्तीत राहिल्या. दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.84 रुपये प्रति लिटर आणि मुंबईमध्ये 111.77 रुपये प्रति लीटर राहिल्या. मुंबईमध्ये डिझेलची किंमत 102.52 रुपये प्रति लिटरवर स्थित राहिल्या. तर दिल्लीमध्ये रविवारी डिझेलची किंमत 94.57 रुपये राहिली.