स्वच्छ हात धुवा दिनानिमित्त स्वच्छ हात धुण्याबाबत प्रात्यक्षिक व डेटॉल साबणाचे वाटप …
त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी):
श्रीमान. टि.जे. चौहान ( बीटको ) माध्यमिक विद्यालय मोरवाडी नाशिक येथे राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वछतेबाबत स्वच्छ हात धुन्याबाबतची माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी जेवणाआधी बाहेरुन घरात आल्यावर तसेच शौचालयाचा वापर केल्यानंतर प्रत्येक वेळेस साबण किंवा हँडवॉश लावून हात स्वच्छ धुवावेत. याबाबत या शाळेच्या उपशिक्षिका मीनल लोखंडे यांनी प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मुख्याध्यापक साहेबराव अहिरे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छ हात धुण्याचे महत्व व सुदृढ आरोग्याबाबत माहिती दिली. मोरवाडी परिसरातील बालाजी ट्रेडर्सचे संचालक डुगराम चौधरी यांनी स्वच्छ हात धुवा दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना डेटॉल साबण वाटप केले.
कार्यक्रमास शाळेचे पर्यवेक्षक कीर्तीकुमार गव्हाणकरी, शोभा देवरे, ज्योती माळवे, स्वाती पाटील, तनुजा शहाणे, संदीप देवरे,क्रिडाशिक्षक दिनेश आहिरे, शिवाजी मोरे, नितीन कंक, यशवंत गावीत, सुनील अहिरे, जिवन गांगोडे, प्रदीप ठाकरे, हरित सेना समन्वयक प्रदीपसिंग पाटील, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.