अभद्र भाषेत 50 टक्क्यांची घसरण झाल्याचा फेसबुकचा दावा
नवी दिल्ली,
अभद्र भाषेला निपटण्यात असमर्थतेवरुन मीडियामध्ये आलेल्या बातम्यांना फेटाळत फेसबुकने दावा केला की मागील तीन तिमाहीमध्ये त्यांच्या मंचावर अभद्र भाषेचे प्रचलन जवळपास 50 टक्क्याने कमी झाले आहे.
फेसबुकचा हा दावा रविवारी द वॉल स्ट्रीट जर्नल (डब्ल्यूएसजे) च्या एका बातमीच्या उत्तरात आला आहे. बातमीमध्ये सांगण्यात आले होते की फेसबुकचे कंटेंट मॉडरेटर आर्टिफिशियल इंटेलिंजेस (एआय) चा उपयोग करुन आक्षेपजनक सामग-ीला हटविण्यात सतत अयशस्वी राहिले आहे.
एका उत्तरामध्ये फेसबुकमधील व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंटीगि-टी गाइ रोसेन यांनी म्हटले की त्यांचे तंत्रज्ञान फेसबुकवर लोकाद्वारा दाखविण्यात येणार्या अभद्र भाषेला कमी करण्यावर मोठा प्रभाव पडत आहे
त्यांनी म्हटले की आमच्या लेटेस्ट सामुदायीक मानक प्रवर्तन रिपोर्टनुसार याची व्यापकता पाहिली गेली की सामग-ीचे जवळपास 0.05 टक्के आहे किंवा प्रत्येक 10 हजारावर जवळपास 5 वेळा पाहिले गेले आहे. जे मागील तीन महिन्यात जवळपास 50 टक्क्याने कमी आहे.
रोसेनने म्हटले की लीक करण्यात आलेल्या कागदपत्रातून निघालेल्या डेटाचा वापर एक कथा बनविण्यासाठी केले जात आहे की द्वेष पसरविणारे भाषणा विरुध्द लढण्यासाठी आम्ही ज्या तंत्राचा उपयोग करत आहोत ते अपर्याप्त आहे आणि आम्ही जाणुबझून आपल्या प्रगतीला चूकीच्या पध्दतीने सादर करत आहोत हे सत्य नाही.
डब्ल्यूएसजेच्या बातमीमध्ये दावा केला गेला की अंतर्गत कागदपत्र सांगत आहेत की दोन वर्षापूर्वी फेसबुकने मानव समीक्षांकाद्वारा अभद्र भाषेच्या तक्रारीवर लक्ष केंद्रित करण्याच्या वेळेला कमी केले होते आणि अन्य समायोजनासाठी ज्यातून तक्रारकर्त्यांची संख्या कमी झाली.
पुढे म्हटले की याच्या ऐवजी दिसून आले की फेसबुकचा एआय कंपनीच्या नियमांना लागू करण्यात वास्तवामध्ये किती यशस्वी झाला होता.
रोसेनने एका ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले की फक्त सामग-ीना हटविण्यावर लक्ष केंद्रित करणे हे पाहणे चूकीची पध्दत आहे की आम्ही अभद्र भाषे विरुध्द कसे लढत आहोत.