पशुधन पाळुन दूध व्यवसाय करणे हा गुन्हा तर नाही ना, भुसावळ व बोदवड ता.पशुधन डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याबाबत

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी

आज रोजी वरणगाव व आसपास गाव परिसरातील पशुधन आजारी पडल्यास औषध उपचार व लसीकरणासाठी शासन डॉक्टरांची रिक्त असलेली पदे भरतीचा मुहूर्त करणार का?
सविस्तर माहिती
भुसावळ तालुक्यामध्ये 10 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी -१-४
भुसावळ वरणगाव किनी कुऱ्हा श्रेणी -२-६ तळेगाव कठोरा काहुरखेडा गोरोजा वराडसीम सुनसगाव
रिक्त पदे
पशुधन विकास अधिकारी १ अतिरिक्त प्रभार डॉक्टर तडवी
साहेब
पशुधन पर्यवेक्षक रिक्त पदे ०३
बोदवड तालुका
पशुवैद्यकीय दवाखाने ०६
पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी-२-३
कोल्हाडी शेलवड सुरवाड
रिक्त पदे
पशुधन विकास अधिकारी रिक्त पदे ०३
एनगाव अतिरिक्त प्रभार डॉक्टर तडवी बोदवड डॉक्टर येवले कुरा येथील डॉक्टर
जामठी- डॉक्टर वाघोदे किन्ही येथील डॉक्टर
पशुधन पर्यवेक्षक रिक्त पदे ०३

वरणगाव शहरातील पशुधन डॉक्टराचें पद हे जवळ जवळ आठ महिन्यांपासून रिक्त असल्यामुळे येथील डॉक्टरांवर रिक्त पदांमुळे अतिरिक्त भार सोसावा लागत असुन पशुधन हे गंभीर असल्यास वेळेवर आम्ही पशुधना पर्यंत पोहचु न शकल्यास व मृत्यू झाल्यास या विषयी आम्हाला दुःख व खंत वाटत असते
शासनाच्या अशा गलथन कारभारामुळे पशुधन मालकांन मध्ये तीव्र नाराजी व संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे
मुक्या प्राण्यांना सरकारी सेवा वेळेवर मिळेल का
पशुधन आजारी पडल्यास आपत्कालीन परिस्थितीमध्ये मालकाने काय करावे पशुधन पाळणे हा आमचा गुन्हा तर नाही ना
झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाने जागे होऊन योग्य तो ठोस निर्णय घ्यावा व मुक्या प्राण्यांना योग्य वेळीच औषध उपचार लसीकरण मिळाले तर आमचे पशुधन हे मृत्यू होण्याच्या संकटातून वाचू शकते
या अनुषंगाने जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर अविनाश इंगळे यांच्याशी वार्तालाप केला असता रिक्त असलेल्या पदांबाबत शासनाला पाठपुरावा आम्ही केलेला आहे व होणारी गैरसोय टळुन लवकरच योग्य ते औषध उपचार लसीकरण पशुधनाला मिळणार आहे

वृक्ष संवर्धन काळाची गरज….

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!