सावखेडा येथे मराठी मुलांची जिल्हा परिषद शाळेच्या आवारात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न..
निंभोरा बु. – ( प्रमोद कोंडे. mob.- 9922358586 )
रावेर तालुका विधी सेवा समिती व रावेर तालुका वकिल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सावखेडा जिल्हा परिषद शाळे मध्ये कायदे विषयक शिबिर घेण्यात आले .या आयोजित कार्यक्रमात जेष्ठ विधीतज्ञ ऍड आर.एन.चौधरी , रावेर तालुका वकिल संघाचे अध्यक्ष अँड जगदिश महाजन, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक सचिन नवले , रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास ताठे , ऍडव्होकेट रमाकांत महाजन, ऍड धनराज पाटील, ऍड निलेश महाजन, पो, कॉ. श्रीराम कागंत्रणे,राजेंद्र अटकाळे, दिपक तायडे, बि,यु पाटील,भरत बारी ,लोकनियुक्त सरपंच ललिता पाटील, बेबाबाई बखाल, उपसरपंच सविता नवले ,माजी उपसरपंच अल्लादिन तडवी, महेंद्र पाटील गौरखेडा, किरण पाटील, तुषार चौधरी, स्वाती बखाल, हे व्यासपीठावर उपस्थित होते. जेष्ठ विधीतज्ञ आर.एन. चौधरी यांनी सखोल कायदे विषयक मार्गदर्शन केले तर याप्रसंगी ऍड रमाकांत महाजन, ऍड. जगदीश महाजन, विलास ताठे, बी.यु.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर या कार्यक्रमाचे आयोजन सावखेडा बुदृक व खुर्द दोन्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यशस्वी करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक तायडे यांनी तर आभार प्रा. शि. प्रशांत आंबेकर यांनी मानले. तसेच उपसरपंच ममुताज तडवी. ग्रामसेवक आर.जी.चौधरी, अनिल पाटील, युवराज कराड, भागवत महाजन, प्रदीप महाजन, सोमा महाजन, विकास पाटील,सुभान तडवी, नूर मोहम्मद तडवी, अमोल नहाले, विजय जैन, रविंद्र श्रीखंडे रफीक तडवी, संगिता महाजन, छाया पाटील, मनिषा पाटील सह अंगणवाडी सेविका व मदतनीस , आशा स्वंयसेविका व ग्रामस्थ उपस्थित होत्या.