निंभोरा सिम बायपास रस्त्याकडे प्रशासनाच लक्ष लागेल का.!
निंभोरा सिम प्रतिनिधी – ( योगेश पाटील mob.- 9689388271 )
सविस्तर वृत्त असे की गावापासून काही अंतरावर बायपास रस्ता हा काही महिन्यांपूर्वी या रस्त्याची कॉंक्रिटीकरण करण्यात आली होती परंतु ठेकेदाराने रस्त्यावर निकृष्ट दर्जाची मटरेल वापरल्यामुळे रस्त्यावर मोठी मोठी खड्डे पडलेले दिसून येत आहे तसेच या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात रहदारी असते वाहन चालवताना वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागते आणि खड्डे चुकवीत असताना एखादा अपघात होण्याची दाट शक्यता असते. या रस्त्याच्या आजूबाजूला झाडेझुडपे वाढलेली आहे. समोरील येणारे वाहन सुद्धा या रस्त्याने दिसत नाही आणि या पडलेल्या खड्ड्यांमुळे जर एखादा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण अशी ग्रामस्थांच मत आहे. या रस्त्याची चौकशी करून त्वरित काम करून होणाऱ्या अपघातापासून वाहनधारकांना वाचवा अशी ग्रामस्थांची आणि वाहनधारकांची मागणी आहे.