ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील म्हणजे जनतेच्या समस्या मांडणारे नेतृत्व: राज्यमंत्री विश्वजित कदम

लोणंद प्रतिनिधी

प्रा.हेमंत धायगुडे पाटील खंडाळा तालुक्याच्या राजकीय,सामाजिक,कृषी, सहकार अशा विविध क्षेत्रातील विषयांवर सतत प्रयत्नशील असणारे नेतृत्व म्हणजे तालुक्याच्या विद्यमान उपसभापती श्रीमती वंदनाताई अविनाशभाऊ धायगुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोर गरीब जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे,नव विकासाची जाण असणारे ध्येयवादी दमदार युवा नेतृत्व ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील यांनी राज्याचे कृषी,सहकार,सामाजिक न्याय व अल्पसंख्याक राज्यमंत्री विश्वजित कदम यांची भेट घेतली.या भेटीत त्यांनी तालुक्यातील खेड पंचायत समिती गणातील विविध विकासकामांसाठी एकुण रूपये बावीस लक्ष निधीची मागणी केली असून त्यात मौजे खेड बु येथे देवकर वस्तीमधील बाबीरबुवा मंदिरासमोर सभामंडप बांधकाम करणे यासाठी अंदाजपत्रकीय तरतुद रूपये दहा लक्ष, मौजे खेड बु आटाळी वस्ती व वडाचा मळा येथे २ नग हायमॉक्स लॅंप बसविणे तसेच मौजे पाडळी येथील पाटील वस्ती १ व २,पानमळा येथे ३ नग हायमॉक्स लॅंप बसविण्यासाठी अंदाजपत्रकीय तरतुद रूपये बारा लक्ष अशी एकूण रूपये बावीस लक्ष निधीची मागणी करण्यात आली आहे.सर्व विकासकामे लवकरात लवकर मार्गी लागावेत म्हणून युवा नेते ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील यांनी राज्याचे राज्यमंत्री विश्वजित कदम यांची मुंबई येथे भेट घेऊन तातडीने निधी उपलब्ध करून तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी गती मिळावी म्हणून कटिबद्ध असल्याचे चित्र जनमाणसांत दिसत आहे.
राज्याचे राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी देखील खंडाळा तालुक्यातील खेड पंचायत समिती गणातील विविध विकासकामांसाठी तत्परतेने
निधी देण्याचे आश्वासन दिले. ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील प्रंचड जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास असणारे नेतृत्व तालुक्यातील जनतेसाठी नेहमीच सदैव २४ तास उपलब्ध आहेत त्यामुळे विकासकामांना हमखास गती मिळते असे मनोगत राज्याचे कृषी,सहकार,सामाजिक न्याय व अल्पसंख्याक राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी भेटी दरम्यान व्यक्त केले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव दादासाहेब काळे,सोनू गुलदगड,अभिलाष साळुंखे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!