सिंघू बॉर्डर हत्येप्रकरणी निहंगचे हत्येची जबाबदारी स्वीकारून आत्मसमर्पण
नवी दिल्ली,
सिंघू बॉर्डर हत्येप्रकरणी निहंगने हत्येची जबाबदारी स्वीकारून आत्मसमर्पण केलंय त्याला पोलिसांनी अटक केली असून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल. निहंग सरवजीत सिंगने हत्येची जबाबदारी स्वीकारून आत्मसमर्पण केले आहे. सरवजीत सिंगने या हत्येमागे आपला हात असल्याचा दावा पोलिसांसमोर केला. त्याने हात तोडणे आणि हत्या करण्याची जबाबदारी घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सरवजीतच्या चौकशीत, त्यावेळी त्याच्यासोबत तिथं कोण उपस्थित होते हे शोधले जाईल. पोलीस ते सर्व व्हिडीओ तपासात आहेत ज्यात असे आढळून येत आहे की हत्या किती क्रूरपणे करण्यात आली आहे. तपासात आणखी लोकांचीही चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. जर अन्य कोणाचा यात सहभाग आढळला तर त्याला अटकही केली जाईल.
याअगोदर आज, सिंघू सीमेवरील घटनेवर चंदीगड येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली. बैठकीत मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, दोषींना सोडले जाणार नाही. याबाबत सूत्रांनी माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अनिल विज आणि पोलीस महासंचालकांसह इतर उच्च अधिकारी बैठकीला उपस्थित होते. बैठकीत घटनेची माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी कठोर आणि निष्पक्ष कारवाईचे आदेश दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंघू सीमेवरील निर्दयी हत्येच्या प्रकरणात आतापर्यंत दोन नावे समोर येत आहेत.
शुक्रवारी सकाळी एका अज्ञाताचा मृतदेह सिंघू सीमेवर पोलिसांच्या बॅरिकेडला बांधलेला आढळला. मृतदेहाचा एक हात कापला गेला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकाने मृतदेह ताब्यात घेतला. असा आरोप आहे की ती व्यक्ती शीख धार्मिक पवित्र पुस्तकाचा अपमान करताना पकडली गेली, त्यानंतर निहंगांनी त्याची हत्या केली.
तत्पूर्वी, हरियाणा पोलिसांनी सांगितले की, मृताची ओळख लखबीर सिंग वय 35 ते 36 वर्ष राहणार तरनतारण जिल्ह्यातील चीमा खुर्द गावातील मजूर असल्याची सांगितली जात आहे. सोनीपतचे डीएसपी हंसराज म्हणाले की, सकाळी 5 वाजता कुंडली पोलीस ठाण्यात माहिती मिळाली की शेतकरी आंदोलनाच्या स्टेजजवळ एका व्यक्तीचे हात पाय कापून लटकवण्यात आले आहे. तपास सुरू आहे.