टीव्हीएस मोटरकडून आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटर 11,250 रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली प्रतिनिधी

जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचे नियोजन करणार्‍या ग्राहकांकरिता आनंदाची बातमी आहे. टीव्हीएस मोटर कंपनीने आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 11,250 रुपयांनी कमी केली आहे. केंद्र सरकारकडून फेम -2 योजनेंतर्गत मिळणार्‍या अनुदानामुळे कंपनीने ही किंमत कमी केली आहे.

आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत दिल्लीत 1,00,777 रुपये असणार आहे. यापूर्वी या स्कूटरची किंमत 1,12,027 रुपये होती. केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकरिता अनुदान देणारी योजना फेम-2 ची घोषणा केली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर ग-ाहकांना अधिक सवलत मिळणार आहे.

ही आहे इलेक्ट्रिक वाहनांकरिता योजना

मागील आठवड्यात केंद्र सरकारने फेम इंडिया -2 (फास्टर अडोप्शन अँड मॅन्युफॅक्च्युअरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हिकल्स इन इंडिया फेज 2) सुधारित योजना जाहीर केली आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढविण्याकरिता 15 हजारापर्यंत सवलत जाहीर केली आहे. यापूर्वी केंद्र सरकारकडून 10 हजारापर्यंत सवलत देण्यात येत होती. ही सवलत हायब-ीड बस वगळता सर्व हायब्रीड वाहनांकरिता असणार आहे. नुकतेच अवजड उद्योग विभागानेही इलेक्ट्रिक वाहनांना 40 टक्क्यापर्यंत सवलत जाहीर केली आहे. त्यापूर्वी इलेक्ट्रिक वाहनांना 20 टक्क्यापर्यंत सवलत देण्यात येत होती.

इंधन दरवाढीने इलेक्ट्रिक दुचाकींची वाढली मागणी

इंधनाच्या वाढत्या किंमती पाहता इलेक्ट्रिक दुचाकीकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे. पेट्रोलचे दर हे शंभरीवर पोहोचले आहे त्यामुळे सर्वसामान्यांना पेट्रोलवर चालणारी वाहने चालवणे अवघड झाले आहे. याला पर्याय म्हणून आता इलेक्ट्रिक वाहनांकडे ग-ाहक वळत आहेत. काही दिवसांत इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना मोठी मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!