65 – व्या – धम्म चक्र प्रवर्तन, दिनानिमित्त सर्व शक्ती सेना, महाराष्ट्र राज्याच्या, वतीने रेल्वे स्टेशन येथे, जेवणाचे पाकीट (अन्न दान ) वाटप कार्यक्रम संपन्न ….

धामोडी प्रतिनिधी – ( राहुल जैन )

65 – व्या -धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्व शक्ती सेना, महाराष्ट्र राज्याच्या, वतीने विविध कार्यक्रमाचे ,आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संजय मोरे (अण्णा) सर्व शक्ती सेना ,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा, भारतीय जनता पार्टी, अनुसूचित जाती मोर्चा, महाराष्ट्र राज्य सचिव तथा, भारतीय दलीत साहित्य अकादमी दिल्ली महाराष्ट्र राज्य, उपाध्यक्ष हे होते.प्रथम सकाळी भारतरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर, यांच्या पुर्णकृती पुतळ्याला प्रा. संजय मोरे, मायाताई मोरे,वैष्णवी मोरे, प्रज्ञारत्न मोरे परिवार तर्फे, पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्याप्रसंगी प्रा.संजय मोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले. सकाळी महाराष्ट्र एक्स आणि गिताजली एक्स् ने नागपुर येथे दिक्षाभुमी वर अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या बहुजन समाजातील स्त्रि, पुरुष व भीम सैनिकांना, जेवणाचे 200 पाकीट व बिसलेरी पाण्याची बॉटल वाटप करण्यात आले.तसेच नागपूर येथे दिक्षा भूमीवर अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या प्रवांशाच्या सुरखक्षेच्या दृष्टीकोनातून 200 मास्क सर्व शक्ती सेने तर्फे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संजय मोरे सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणुन सेवानिवृत्त अभियंता जिजाबराव पाटील, माजी प्राचार्य भगवान नन्नवरे, स्टेशन अधीक्षक ए. आर.अग्रवाल, सुनिल पाटील कृष्णा सावळे सर्व शक्ती सेना विद्यार्थी, संघठना जळगाव जिल्हाध्यक्ष हे होते. या कार्यक्रमाला दिपक चौधरी सर्व शक्ती सेना, जिल्हा उपाध्यक्ष, डॉ.महेंद्र सुरवाडे, डॉ. संदीप गाढे, सर्व शक्ती सेना, रावेर तालुका अध्यक्ष, प्रा सुनील तायडे,राजेंद्र पाटील सर्व शक्ती सेना, जिल्हा उपाध्यक्ष, नितीन गवई, सुदामा सोनवणे ,राजेंद्र सपकाळे, दिपक वानखेडे , युवराज कोळी, सचिन सुरवाडे, विनोद ठाकरे, सोनु सूर्यवंशी, माया ताई मोरे, संगीता नरेंद्र सोनवणे, सुरेखा रविंद्र इंगळे, वैष्णवी मोरे, प्रज्ञारत्न मोरे, अभिजीत तायडे, कैलास दामोदरे साहिल रगरेज, विनोद पदमे, वसीम शेख, भूषण जाधव,फैज शेख,सलीम रंगरेज, सलीम सैय्यद, सर्व शक्ती सेना ,पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!