कोरोनात पती गमावलेल्या एकल महिलांच्या न्याय हक्कासाठी वात्सल्य समिती व लोकसंघर्ष मोर्चा कटिबद्ध.
निंभोरा सिम प्रतिनिधी (योगेश पाटील)
याबाबत सविस्तर वृत्त अशी की दिनांक 14 ऑक्टोंबर 21 दुपारी साडेतीन वाजता रावेर तहसीलदार यांच्या दालनात रावेर तहसीलदार श्रीमती उषा राणी देवगुणे यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेण्यात आली त्यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांनी मुद्दे मांडले रावेर तालुक्यात कोरोना मुळे पती अथवा मुलगा गमावलेल्या निराधार महिला व पालक व दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचा गाव निहाय सर्वे करावा अशा निराधार महिलांना तात्काळ अन्नसुरक्षेचा योजनेचा लाभ तसेच निराधार पेन्शन योजना. अर्थसहाय्य योजना वीस हजार रुपये तात्काळ देण्यात यावी ज्या महिलांची पतीच्या मृत्यूनंतर कागदपत्र उपलब्ध नसतील तर तात्काळ कॅम्प लावून दाखले संबंधित प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावे एकल महिलांकडे कुठले कौशल्य असल्यास त्यांना संबंधित विभागाच्या योजना मिळून देण्याची शिफारस वात्सल्य समितीने करावे समृद्ध गाव विकास योजना मनरेगा अंतर्गत योजनांचा लाभ देण्यात यावा सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे सर्वांना 50 हजार रुपये अनुदान तात्काळ देण्यात यावी तालुक्यात एक पालक गमावलेल्या मुलांना बाराशे पन्नास रुपये देण्यात यावे व दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना पाच लाख रुपये तात्काळ देण्यात यावी आजच्या बैठकीत तहसीलदार उषा राणी देवगुने. ग्राम विकास अधिकारी नायब तहसीलदार संजय तायडे लोकसंघर्ष मोर्चा च्या नेत्या प्रतिभाताई शिंदे कार्यकर्त्या सुप्रिया चव्हाण तेजस्विता जाधव यांच्यासह रावेर तालुक्यातील.कोरणामुळे विधवा झालेल्या एकल महिला उपस्थित होत्या.