अतिवृष्टी व पूरग-स्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई,
राज्यात जून ते ऑॅक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी, त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ही घोषणा केली.
ही मदत खालील प्रमाणे राहील
जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर.
बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर.
बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर.
ही मदत 2 हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.