काय सांगता…12 हजार वर्षापूर्वीही मनुष्याला तंबाखूचं व्यसन? ’या’ ठिकाणी सापडले पुरावे

मुंबई

तंबाखू खाणं हे आरोग्याला धोकादायक असल्याचं वारंवार सांगितलं जातं. पण तंबाखू मळायची एकदा सवय लागली तर ती सोडणं अवघड जातं. अनेकांच्या दिवसाची सुरुवातच तंबाखू खाण्यापासून होते. भारतात तर तंबाखूचे व्यसन लहानांपासून ते वृद्धांपर्यंत, अनेकांना आहे. आता आपल्याला वाटेल की 400- 500 वर्षापूर्वी किंवा जास्तीत-जास्त 700-800 वर्षापूर्वी मनुष्याला तंबाखूचं व्यसन लागलं असेल. पण तब्बल 12 हजार वर्षापूर्वीही मनुष्य तंबाखू खात असल्याचा पुरावा सापडला आहे. या आधी 3300 वर्षांपूर्वीचे पुरावे सापडले होते.

उत्तर अमेरिकेतील उटा या ठिकाणी पुरातत्व खात्याच्या एका पथकाला 12 हजार वर्षापूर्वीच्या तंबाखूच्या बियांचा शोध लागला आहे. उटा या ठिकाणच्या ग-ेट सॉल्ट डेझर्ट या ठिकाणी हे पुरावे मिळाले आहेत. यावरुन एक सिद्ध झालं आहे की मनुष्याला तंबाखू मळण्याची सवय ही बारा हजार वर्षापूर्वीही होती. तंबाखूचा वापर हा धुम-पान, नशा करण्यासाठी तसेच इतरही कारणासाठी केला जातो. या व्यतिरिक्त वैद्यकीय कारणासाठीही तंबाखूचा वापर केला जातो.

या आधी तंबाखूच्या वापराचे 3300 वर्षांपूर्वीचे पुरावे सापडले होते. अमेरिकेतील अलबामामध्ये एक स्मोकिंग पाईप मिळाली होती. पण आता त्या आधीचेही म्हणजे 12 हजार वर्षांपूर्वीचे पुरावे सापडले आहेत. उत्तर अमेरिकेतील उटा या ठिकाणच्या ग-ेट सॉल्ट लेक डेझर्ट या ठिकाणी 12 हजार वर्षांपूर्वीच्या बियांचा शोध लागला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!