‘ काव्य गौरव ‘ पुरस्काराची साहित्य परिषदेकडून घोषणा

त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी:

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्ह्याच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी दि.17 ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय दहाव्या निमंत्रितांच्या काव्य संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने ‘ काव्य गौरव ‘ पुरस्कारांची घोषणा स्वागताध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रा. डॉ.आनंद अहिरे व आयोकक तथा जिल्हाध्यक्ष नवनाथ गायकर यांनी संयुक्तपणे केली.

यात महाराष्ट्रातील तब्बल (10) दहा प्रतीभावंत कवींचा ‘ काव्य गौरव ‘ पुरस्काराने सन्मान होणार आहे.काव्य गौरव पुरस्कारासाठी घोषणा झालेल्या सन्मानित कवींमध्ये कवी अविनाश ठाकुर ( डोंबीवली ) प्रदीप सरवदे ( मुंबई ) प्रतिभा जाधव ( लासलगाव ) नवनाथ रणखांबे , कवीता मोरवणकर , अंबादास खोटरे , शांताराम वाघ, श्रीराम तोकडे ( इगतपुरी )
विनय पाटील ( जळगाव ) माधवी ययाती – पारख ( इगतपुरी ) आदींचा समावेश करण्यात आला आहे.

‘ काव्य गौरव ‘ पुरस्काराने सन्मानित होणार्या कवींचे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, शुभांगी काळभोर , प्रदेश उपाध्यक्ष देवीदास खडताळे, देवचंद महाले, प्रदीप पाटील, तुकाराम चौधरी, संजय कान्हव, आबा अहिरे, किरण मोरे, संजय निकम, सागर हांडे आदिंसह असंख्य पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!