शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी योगेश अशोक अवसरमल तर उपाध्यक्षपदी जितेंद्र गंभीर जैतकर यांची निवड..

ऐनपुर ता.रावेर येथील जि.प.मराठी मुलांची केंद्र शाळा व्यवस्थापन समिती ची निवड करण्यात आली

ऐनपुर ता.रावेर प्रतिनिधी – ( विजय अवसरमल mob.- 8975436399 )

सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची केंद्र शाळेत दि.१३/१०/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता व्यवस्थापन समिती चे माजी अध्यक्ष अंकुश अवसरमल यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक व पालक यांची सभा घेण्यात आली या शिक्षक पालक सभेत शालेय व्यवस्थापन समिती ची नविन कार्यकारिणी निवड करण्याचा विषय घेऊन सर्वानूमते ठरले या पालक सभेतून प्रथम सदस्य निवडून या सदस्यांमधुन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या निवडीत अध्यक्ष योगेश अशोक अवसरमल उपाध्यक्ष जितेंद्र गंभीर जैतकर यांची निवड करण्यात आली तर सदस्य पदी सखाराम डिगंबर गुरव, विशाल प्रकाश अवसरमल,अजय कैलास कोळी,पुनाबाई प्रकाश पुर्भी,छमाबाई भिमसिंग राठोड, देविका रोहीदास भिल,रायनाबी इरफान खान तर सचिव म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मिरा गणपत महाजन स्था.स्व.सं.सदस्या रंजना नरेंद्र जैतकर शिक्षक सदस्य विशाल पुंडलीक सनेर सर, शिक्षण तज्ञ श्री एस एस पाटील सर, विद्यार्थी प्रतिनिधी चि.जय रमेश कोळी, चि.मित संजय नायके यांची निवड करण्यात आली यावेळी ऐनपुर नगरीचे सरपंच अमोल महाजन,ग्रा.पं.सदस्य सतिष अवसरमल,ग्रा.पं.माजी सदस्य सुनिल खैरे,पंकज पाटील, नितीन जैतकर, व्यवस्थापन समिती चे माजी अध्यक्ष अंकुश अवसरमल,संजय मावळे, दैनिक महाराष्ट्र सारथी चे ऐनपुर प्रतिनिधी विजय एस अवसरमल, दैनिक लोकबातमीदार चे ऐनपुर प्रतिनिधी विजय के अवसरमल,सर्व पदाधिकारी शिक्षक व पालक उपस्थित होते या सभेचे सुत्रसंचलन विशाल सनेर सर यांनी तर आभार घोलाणे सर यांनी मानले अशा खेळीमेळीच्या वातावरणात शालेय व्यवस्थापन समिती ची निवड करण्यात आली.

अध्यक्ष – योगेश अशोक अवसरमल

____________________________________________________

उपाध्यक्ष – जितेंद्र गंभीर जैतकर
बातमी शेअर करा :
error: Content is protected !!