टीम इंडियात रोहित शर्माची जागा घेऊ शकतात हे 3 खेळाडू

मुंबई

टीम इंडियामध्ये लवकरच असे काही मजबूत खेळाडू येऊ शकतात जे लवकरच अनेक जुन्या खेळाडूंचा पत्ता कापू शकतात. यामध्ये पहिलं नाव येतं ते रोहित शर्माचे. टीम इंडियाचा ’हिटमॅन’ रोहित शर्माचं वय आता 34 झालं आहे. त्यामुळे त्याच्या जागी खासकरुन टी-20 टीममध्ये नवे खेळाडू येण्याची शक्यता वाढली आहे.

टीम इंडियामध्ये स्पर्धा सातत्याने वाढत आहे, त्यामुळे आगामी काळात ’हिटमॅन’ रोहित शर्माच्या अडचणी वाढू शकतात. रोहित शर्मा सध्या 34 वर्षांचा आहे, 2023 एकदिवसीय विश्वचषक लक्षात घेऊन मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. 2023 एकदिवसीय विश्वचषक फार दूर नाही, ज्यासाठी टीम इंडियाला आतापासून तयारी करावी लागेल. 2023 चा एकदिवसीय विश्वचषक भारतात आहे, त्यासाठी टीम इंडिया पूर्ण ताकद लावणार आहे. टीम इंडियामध्ये असे काही मजबूत खेळाडू आहेत, जे लवकरच टीम इंडियाकडून ’हिटमॅन’ रोहित शर्माचा पत्ता कापू शकतात.

फलंदाज पृथ्वी शॉ स्फोटक फलंदाजी करण्यात माहिर आहे. पृथ्वी शॉची बॅट या दिवसात खूप चालते आहे. भारतीय क्रिकेट संघात पृथ्वी शॉला सलामीवीर म्हणून प्रबळ दावेदार मानले जाते, जो रोहित शर्माची जागा भरू शकतो. पृथ्वी शॉला अनेकदा रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडियामध्ये संधी मिळाली आहे आणि त्याने आपल्या जलद फलंदाजीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पृथ्वी शॉ हा सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचा संयोजन मानला जातो. येत्या काळात पृथ्वी शॉ ’हिटमॅन’ रोहित शर्माची जागा भरुन काढू शकतो. भारताने एकदा पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील विजेतेपदही पटकावले आहे. शुभमन गिल आणि शिवम मावी सारखे स्टार्सही त्यावेळी त्याच टीमचा भाग होते.

टीम इंडियाचा युवा खेळाडू इशान किशन फलंदाजीबरोबरच यष्टीरक्षणातही तज्ज्ञ आहे. अलीकडेच, मुंबईला आयपीएल प्लेऑॅफमध्ये पोहोचण्यासाठी हैदराबादविरुद्ध मोठ्या विजयाची गरज होती, ज्यामध्ये इशान किशनने 32 चेंडूत 84 धावा केल्या. इशान किशनच्या डावात 11 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. ईशान किशनची ही स्फोटक खेळी पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. इशान किशन आगामी काळात रोहित शर्माची जागा घेऊ शकतो आणि एकटा सामन्याची दिशा बदलू शकतो.

ज्याप्रमाणे रोहित शर्माला मधल्या फळीतील फलंदाजामधून सलामीवीर बनवण्यात आले, त्याचप्रमाणे ॠषभ पंतलाही टीम इंडियाचा सलामीवीर बनवता येईल. टीम इंडियाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ॠषभ पंत हा डावखुरा फलंदाज आहे, जो सलामीला कोणत्याही विरोधी संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो. जर ॠषभ पंत टीम इंडियाचा सलामीवीर बनला तर तो या ठिकाणी बराच काळ वादळ निर्माण करू शकतो. ॠषभ पंत कर्णधारपदामध्येही तज्ज्ञ आहे. आगामी काळात तो रोहित शर्माशी सलामीला तसेच कर्णधारपदाच्या स्पर्धेत उतरेल. ॠषभ पंतकडेही धोनीसारखीच ताकद आहे. 2007 मध्ये जेव्हा धोनीला टीम इंडियाचे कर्णधारपद देण्यात आले, तेव्हा त्याचा भारताला मोठा फायदा झाला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दोन विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. हे सर्वांना माहीत आहे की विकेटकीपरला मैदानावरील कोणत्याही खेळाडूपेक्षा खेळ अधिक समजतो, म्हणून पंतला धोनीप्रमाणे वापरता येऊ शकते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!