मेरी देश की बेटी मैदान की राणी हा पहिला अंक ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल..
दैनिक महाराष्ट्र सारथी धुळे वार्ताहर प्रतिनिधी ऋषिकेश अहिरे
धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटना आणि सारथी संस्था,महाराष्ट्र १३ जून २०२१ रोजी,प्रमुख मान्यवरांचे हस्ते ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले.
या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्याला माजी उपसंचालक(क्रीडा व युवक संचालनालय,पुणे) श्री. जयप्रकाश दुबळे सर,महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष श्री. जय कवळी सर,जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सुनंदा पाटिल मॅडम (नंदुरबार),पुणे येथील चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. श्रद्धा नाईक मॅडम,किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषारजी रंधे,महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष श्री. भरतकुमार व्हावळ सर,सचिव डॉ. राकेश तिवारी,भारतीय बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षक सुभेदार जयसिंग पाटिल सर,महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष श्री.आनंद पवार सर,धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष श्री. कैलास जैन सर, खजिनदार भाऊसो. राजेंद्र बोरसे,आंतरराष्ट्रीय मल्लखांब पंच श्री. भूपेंद्र मालपुरे सर,शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्री. संजय होळकर सर,ओ. एम. आर रुपनर शाळेचे मुख्याध्यापक श्री.भटू राजे सर, एच. आर.पटेल महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनय पवार सर,महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे सचिव तायाप्पा शेंडगे सर,सारथी संस्थेचे अध्यक्ष श्री. निखीलराजे आवळे, सारथी संस्थेचे सचिव तथा या अंकाचे संपादक ऋषिकेश अहिरे,शारीरिक शिक्षण शिक्षक सागर कोळी,मनोज चौधरी,मोहसीन कुरेशी आदी मान्यवर,स्वतंत्र मा.फायनान्स चे अधिकारी सुद्धा उपस्थित होते त्याचबरोबर महिला खेळाडू या कार्यक्रमाला उपस्थित होते.
“मेरी देश की बेटी मैदान की राणी” या पहिल्या अंकाचे ऑनलाईन प्रकाशन जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सुनंदा पाटिल मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले व त्यांनी या अंकाला क्रीडामय शुभेच्छा दिल्या तर त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की महिला खेळाडूंना मैदानावर येण्यासाठी प्रोत्साहित करणे ही काळाची गरज आहे तर महिला सक्षमीकरणावर अधिक भर दिली पाहिजे,माजी उपसंचालक श्री.जय प्रकाश दुबळे,महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष श्री.जय कवळी व डॉ. श्रद्धा नाईक यांनी आपले मते मांडले,समाजात महिला खेळाडू विषयी अधिक आदर निर्माण झाला पाहिजे व त्यांना प्रोत्साहन मिळेल या दृष्टीने विविध क्रीडा संघटनांनी ध्येय आखली आहेत,त्यांचेच एक पाऊल म्हणून मेरी देश की बेटी मैदान की राणी हा अंक धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटना व सारथी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित करण्यात आला,या संपुर्ण प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. मयुर ठाकरे सर यांनी केले तर प्रास्ताविक भरत कोळी व आभार प्रदर्शन धुळे जिल्हा संघटनेचे सचिव मयुर बोरसे यांनी केले..
या संपूर्ण ऑनलाईन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे तांत्रिक अधिकारी ऋषिकेश अहिरे यांनी पेलली .
हा अंक ऑनलाईन ” http://bit.ly/3zguovU ” या link वर उपलब्ध आहे.