खिर्डी बु, येथे आजादी का अमृत महोत्सव निमित्त स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम संपन्न..!

रावेर तालुका प्रतिनिधी:-(प्रदीप महाराज)

भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केद्र जळगावं वं नेचर हार्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खिर्डी बु. येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम घेण्यात आला. सदरील कार्यक्रमात 60 ते 80 किलो ग्राम सिंगल युज पाँलीथीन कॅरीबॅग व इतर प्लास्टिक वेस्टेज गोळा करण्यात आले.तसेच स्वच्छ गाव सुंदर गाव,भारत माता की जय चे नारे देऊन स्वच्छते विषयी जनजागृती करण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम प्रसंगी रावेर पंचायत समिती सभापती सौ. कविता हरलाल कोळी म्हणाल्या की, स्वच्छता अभियानात गाव किती स्वच्छ करण्यात आले हे महत्त्वाचे नसून स्वच्छते प्रती लोकांमध्ये जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. असे त्यांनी सांगितले. कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती सदस्य दिपक पाटील, जेष्ठ शिवसैनिक छोटूदादा पाटील, सरपंच गफूरभाऊ कोळी, ग्रा.पं.सदस्य विनोद पाटील, पंकज राणे, सामाजिक कार्यकर्ते हरलाल कोळी, विनायक जहुरे, बांधकाम ठेकेदार अल्ताफ बेग अस्लम शेख, ग्रा.रो.सेवक संघटनेचे ता.सचिव उमेश तायडे, रो.सेवक प्रदीप कोचुरे, नेचर हार्ट फाउंडेशन चे अध्यक्ष अँड. शिवदास कोचुरे, उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे कामकाज नेहरू युवा केंद्र जळगाव चे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर व लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर तालुका समन्वयक आनंदा वाघोदे यांनी पहिले.
स्वच्छ भारत अभियान या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेचर हार्ट फाउंडेशन चे संचालक प्रशांत गाढे, सदस्य सचिन वाघोदे, प्रशिक वाघोदे, तुषार वाघोदे, पंकज वाघोदे, सुरेश वाघोदे, निलेश वाघोदे, आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!