प्रशांतराज तायडे राज्यस्तरीय पर्यावरण शिक्षक पुरस्काराने सन्मानित..!
रावेर तालुका प्रतिनिधी:- (प्रदीप महाराज)
दि.10 सप्टेंबर 2021 रोजी जळगाव येथे राजनंदिनी बहुद्देशीय संस्था व श्री राजपूत करणी सेना जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगाव येथे विविध विभागामध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या विविध विभागातील व्यक्तींना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी पर्यावरण विभागांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात कार्य करत असल्यामुळे घाटे एस.विद्यालय उचंदे येथील राष्ट्रीय हरित सेना शिक्षक प्रशांतराज सुपडु तायडे यांना राज्यस्तरीय पर्यावरण शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यावेळी राजनंदिनी फाउंडेशन च्या अध्यक्षा संदीपा वाघ, सिंगल वुमन फाउंडेशन च्या अध्यक्षा मीनाक्षी चव्हाण,माजी मुख्याध्यापक सुरेश वाघ,
राजपूत करणी सेना चे कार्याध्यक्ष विलास पाटील, बी.एच खंडाळकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.प्रशांत तायडे यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल दर्जी फाउंडेशन चे संचालक प्रा.गोपाल दर्जी सर, श्रीराम उदयोग समूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील, जि. प. समाजकल्याण सभापती जयपालभाऊ बोदडे,चेअरमन माणिकराव पाटील, उपाध्यक्ष भागवत पाटील सचिव रामभाऊ पाटील, मफदा राज्य अध्यक्ष विनोदभाऊ तराळ ,मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष यु.डी.पाटील सर जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस ईश्वर रहाणे ,संदीप देशमुख,माजी प.स.सदस्य किशोरभाऊ चौधरी,राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष पवनराजे पाटील, मुकेश भाऊ वानखेडे नगरसेवक, पियुष मोरे आदींनी तायडे याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.