पंतप्रधान 12 ऑक्टोबर 2021 रोजी होणार्‍या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 28व्या वर्धापन दिन कार्यक्रमात उपस्थित राहणार

नवी दिल्ली,

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 28 व्या वर्धापन दिनानिमित्त 12 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता होणार्‍या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण देखील होणार आहे.

केंद्रीय गृह मंत्री तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाविषयी थोडक्यात माहिती (र्‍प्ींण्)

मानवी अधिकारांचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 अन्वये 12 ऑक्टोबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली. मानवी अधिकारांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होत असल्यास त्या घटनेची दाखल घेऊन हा आयोग त्या संदर्भात चौकशी करतो आणि मानवाधिकारांचे उल्लंघन झाले आहे असे सिध्द झाल्यास पीडितांना नुकसानभरपाईची रक्कम देण्याची शिफारस सरकारी अधिकार्‍यांना करतो तसेच दोषी सरकारी कर्मचार्‍यांविरुध्द प्रतिबंधक आणि कायदेशीर कारवाईची शिफारस देखील करतो.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!