जहाल नक्षली अजय हिचामीला अटक; 2 लाखांचे होते बक्षीस

गडचिरोली,

दोन लाख रुपयांचे बक्षीस असलेला जहाल नक्षलवादी अजय हिचामीला (वय 30 वर्षे) गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी (आज) नक्षल विरोधी अभियान राबवत असताना गडचिरोली पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलीस उपविभाग हेडरी अंतर्गत येणार्‍या पोलीस मदत केंद्र गट्टा (जां.) हद्दीत सोमवारी (आज) गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या नेतृत्वात गट्टा (जा.) जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोलीचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवित होते. तेव्हा जहाल नक्षली अजय हिचामी याला अटक करण्यात जवानांना यश आले. नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील झारेवाडा येथील रहिवासी असलेला अजय हिचामी (वय 30 वर्षे) हा 2019 मध्ये गट्टा नक्षलदलामध्ये भरती होवुन सशस्त्र दलम सदस्य पदावर कार्यरत होता. तसेच तो नक्षलच्या ?क्शन टीमचा सदस्य होता. 2021 मध्ये पोलीस मदत केंद्र गट्टावर दोन वेळा झालेला अटॅक, बुर्गी पोलीस मदत केंद्रावर झालेला अटॅकमध्ये त्याचा समावेश होता. तसेच 18 सप्टेंबर रोजी सुरजागड येथे झालेल्या सोमाजी चैतु सडमेक याच्या खुनामध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. 2019 पासुन आजतागायत त्याच्यावर एकुण 03 खुन, 05 चकमक व 01 दरोडयाचा असे एकुण 09 गंभीर गुन्हे दाखल आहेत. शासनाने त्याच्यावर 02 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. याव्यतिरीक्त त्याचा आणखी किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे, याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!