रावेर, यावलच्या वाहन धारकांना जादा भुर्दंड … अखेर टोलनाक्यावर मासिक पास देण्याचे आश्वासन !

निंभोरा बु. प्रतिनिधी-

भुसावल – जळगांव दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरी रस्त्याचा वापर करण्यासाठी रावेर – यावल तालुक्यातील वाहनधारकांना रोजचे कार साठी 85 रु. द्यावे लागत आहे. हा भुर्दंड कमी व्हावा. वाहन धारक कमी अंतराचा महामार्ग वापरतात मात्र त्यांना तीन पट जादाचा भुर्दंड द्यावा लागतो.अशा अनेक तक्रारी टोल नाक्यावर येत असून निंभोरा येथील सामाजिक कार्यकर्ते शरद तायडे , रावेरचे माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी यांनी भुसावलच्या वाहन धारकांनप्रमाणेच मासिक पास उपलब्ध व्हावी अशी मागणी करीत तक्रार केली आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी सिन्हा यांनी यावर तोडगा काढत सांगितले रावेर आणी यावल तालुक्यातील वाहन धारकांनी विनंती अर्ज दिल्यास त्यांनाही भुसावल करांप्रमाणे 285.रुपयात मासिक पास उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी मान्य केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!