रावेर तालुक्यातील सुनोदा येथील रहिवाशी राजेंद्र सपकाळे दिल्ली येथे कोरोना योद्धा पुरस्काराने सम्मानित
धामोडी प्रतिनिधी (राहुल जैन)
दिल्ली येथे सर्व शक्ती सेना सामाजिक संघठनेच्या वतीने तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली आयोजित कार्यक्रमात सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल राजेंद्र सपकाळे यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंजाब येथील माजी केंद्रिय मंत्री पदमश्री जितेंदरसिंग शंटी शहीद भगतसिंग दल चेअरमन पंजाब, निरज सेठी सर्व शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष, प्रा. संजय मोरे सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,डॉ.सत्यनारायण जतिया माजी केंद्रीय मंत्री, दिलीप पांडे मंत्री आप आदमी पार्टी व नेता, डॉ.सोहनपाल सुमनाक्षार, जयसुमनाक्षर, राजेन्द्र गुप्ता,राज विशिष्ट, वैभव आहुजा, दिनेश गाधी,तसेच सर्व शक्ती सेना राज्याचे अध्यक्ष उपस्थित होते.राजेंद्र सपकाळे याना पुरस्कार मिळाल्या बदल निरज गुप्ता,प्रा. संजय मोरे, माया मोरे,अजित तायडे मंत्रालय सचिव,कृष्णा सावळे, संदीप गाढे, दिपक वानखेडे, प्रल्हाद महाजन, गोपाळ पाटील, गोकुळ करवले, सुकदेव सोनवणे, रामदास लहासे, विठ्ठल पाटील,देवेन्द्र महाजन,वसंत चाैधरी, नितीन गवई, प्रवीण धुदले, इत्यादींनी अभिनंदन केले.