महाविकास आघाडीचा आज राज्यव्यापी बंद परंतु यावल शहरात अल्प प्रतिसाद,नागरिक व्यापारी वर्गात तीव्र नाराजी.
यावल – दि.11 – प्रतिनिधी
महाविकास आघाडीचा आज राज्यव्यापी बंद असला तरी मात्र यावल शहरात महाविकास आघाडीला अल्प प्रतिसाद मिळाला आहे महाविकास आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते, व्यापारी,नागरिकांना आप- आपली दुकाने प्रतिष्ठाने बंद करण्याचे आव्हान करीत असताना किरकोळ विक्रेते,हातगाडीवर विविध वस्तू विक्रेते,व्यापारी,नागरिकांनी तेवढ्यापुरता म्हणजे पंधरा-वीस मिनिटं आपली दुकाने बंद करून मार्केट बंद करण्याच्या आव्हानाला प्रतिसाद दिला. बाजारपेठ बंद करण्यासाठी महा विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते पुढे गेल्यानंतर यावल शहरातील दुकाने,बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली यात महाविकास आघाडीला फक्त पंचवीस टक्के प्रतिसाद मिळाला.बाजार मार्केट दुकाने बंद करण्याच्या आव्हानामुळे यावल शहरातील नागरिकांमध्ये आणि अनेक व्यवसायिकांमध्ये महाविकास आघाडी बाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी सत्तेसाठी आप आपले स्वतंत्र असलेले राजकीय ध्येय,धोरण,उद्दिष्टे आणि काम करण्याची पद्धत बाजूला ठेवून महाविकास आघाडी केली आहे. हे नागरिकांच्या मतदारांच्या चांगल्या प्रकारे लक्षात आले आहे यावल तालुक्यात अनेक समस्या प्रलंबित असताना तसेच नैसर्गिक अनियमित आपत्तीमुळे, कोरोनामुळे आधीच सर्व जाती धर्मातील नागरिक शेतकरी व्यापारी मजूर वर्ग आर्थिक अडचणीत सापडला होता आणि आहे.तसेच सहकारी प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर असताना आणि काही प्रकल्प बंद पडलेले असल्याने तसेच चोपडा,यावल, रावेर तालुक्यात अनुक्रमे शिवसेना,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, सत्ताधारी विद्यमान आमदार असताना आणि रावेर लोकसभा मतदार संघात केंद्रातील भाजपाच्या खासदार रक्षाताई खडसे असताना सुद्धा नागरिकांना व्यापाऱ्याना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.अनेक विकास कामांमध्ये गैरप्रकार भ्रष्टाचाराच्या तक्रारी नागरिकांच्या असताना त्याकडे विद्यमान आमदार,खासदार, आणि काही जबाबदार पदाधिकारी कार्यकर्ते यांचे सोईस्कररित्या दुर्लक्ष होत आहे. यावल,रावेर,चोपडा तालुक्यातील मतदार संघातील मतदारांमध्ये नागरिकांमध्ये राजकारणाविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.यामुळेच यावल शहरातील नागरिक,व्यापारी,शेतकरी, मजूरवर्ग महाविकास आघाडीच्या राज्यव्यापी बंद पासून चार हात लांब राहिल्याचे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.
असे असताना सुद्धा आज यावल शहरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांनी राज्यव्यापी बंद साठी यावल शहर बंद करण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना25टक्के प्रतिसाद मिळाल्याचे प्रत्यक्ष दिसून आले.
_______________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !