पाकिस्तानी अणू शास्त्रज्ञ अब्दुल कादिर खानचे निधन
इस्लामाबाद,
पाकिस्तानी अणु कार्यक्रमाचे संस्थापक असलेले अणू शास्त्रज्ञ अब्दुल कादिर खान यांचे रविवारी 85 व्या वर्षी फुफुसाच्या आजाराने निधन झाले अशी माहिती त्यांच्या कुटुंबाने दिली.
एका बातमीमध्ये सांगण्यात आले की शनिवारी रात्रीला खान यांची तबीयत बिघडू लागली यानंतर त्यांना इस्लामाबादमधील खान रिसर्च लेबोरेटरीज रुग्णालयात नेण्यात आले होते.
या आधी ऑगस्टमध्ये कादीर कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांना याच रुग्णालयात भरती करण्यात आले होते. सरकारी अधिकार्याने सांगितले की कोरोना विषाणूवर यशस्वी उपचारानंतर त्याना घरी नेण्यात आले होते.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम-ान खानने अणू शास्त्रज्ञ अब्दुल खान यांच्या कुटुंबाच्या प्रति आपल्या संवेदना व्यक्त करत टिवीट केले की पाकिस्तानला अणु शस्त्र राज्य बनविण्यामध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदानासाठी राष्ट्र त्यांना सतत प्रेम आणि स्मरण करेल.