मुंबई इंडियन्स आयपीलमधून बाहेर; रोहित शर्माने अद्याप हार मानलेली नाही!
मुंबई,
पाच वेळा चॅम्पियन असलेली मुंबई इंडियन्स आयपीएल 2021 मध्ये प्ले ऑॅफमधून बाहेर पडली आहे. मुंबई प्लेऑॅफ खेळणार नसल्याने मुंबईच्या चाहत्यांना फार दु:ख झालं आहे. दरम्यान केवळ चाहतेच नाही तर प्लेअर्सना देखील याचं वाईट वाटलं आहे. प्ले ऑॅफमधून बाहेर पडल्यानंतर रोहित शर्माने सोशल मीडियावर एक भावनिक संदेश लिहिला आहे.
सोशल मीडियावर लिहीताना रोहित शर्मा म्हणतो, ‘हे 14 सामने मुंबई इंडियन्सची शान कमी होऊ देणार नाहीत, जे मुंबईने गेल्या काही वर्षांत मिळवलं आहे. हा सीझन चढ -उतारांनी भरलेला होता. पण हे 14 सामने गेल्या 2-3 हंगामात मिळवलेली शान कमी होणार नाहीत. ब्लू आणि गोल्डन जर्सी घातलेला प्रत्येक खेळाडू अभिमानाने खेळला आणि त्याने आपलं सर्वोत्तम दिलं. हेच एक टीमप्रमाणे बनवतं जे आपण आहोत.‘
दरम्यान शेवटचा सामना झाल्यानंतर प्लेऑॅफमध्ये स्थान गमावल्यावर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नेमकी चूक कुठे झाली याबद्दल सांगितलं आहे, ‘आम्ही जे साध्य केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे. दिल्लीमध्ये, आम्ही सामना जिंकल्यानंतर लयीत येत होतो पण त्यानंतर ब-ेक लागला. इथे आल्यानंतर एक संघ म्हणून आम्ही एकत्रितपणे अपयशी ठरलो. आज जिंकल्याचा आनंद आहे. आम्ही सर्व काही दिलं आणि मला खात्री आहे की ते चाहत्यांसाठी देखील मनोरंजक असेल.ङ्ग
प्ले-ऑॅफमध्ये स्थान मिळवण्यात संघाच्या अपयशाबद्दल रोहित म्हणाला, ‘जेव्हा तुम्ही मुंबईसारख्या फ्रँचायझीसाठी खेळता, तेव्हा तुमच्याकडून नेहमीच चांगली कामगिरी अपेक्षित असते. मी याला दबाव म्हणणार नाही, ही अपेक्षा आहे.‘