महाराष्ट्र बंदमध्ये व्यापारानी सहकार्य करून दुकाने बंद ठेवा : जिल्हाप्रमुख समाधान महाजन
महाविकास आघाडीची संयुक्त बैठकीत निर्णय
वरणगाव प्रतिनिधी –
येत्या ११ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवार रोजी सायंकाळी सात वाजता जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत वरण गावातील व्यापाऱ्यांनी सोमवारी आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे, असे या बैठकीत आव्हान करण्यात आले.
केंद्रीय मंत्री यांच्या मुलाने लखमीपूर येथील शेतकऱ्यांना चीरडल्याची घटना अतिशय दुर्दैवी काळीमा फासणारी आहे. या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र महा विकास आघाडीतर्फे ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद मालकाचा करण्यात येणार आहे. या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा. असे महाविकास आघाडीच्या बैठकीत आव्हान करण्यात आले आहे.
या बैठकीमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, जिल्हा संघटक विलास मुळे, सुभाष चौधरी, सईद मुल्लाजी, संतोष माळी, सुरेश चौधरी तर काँग्रेसचे के. बी. काझी, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष अश्फाक काझी, सादिक मन्यार, अहमद शेख, अशोक भैसे, अमजद शेख आदी महा विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.