हिंगलाज मातेचा यात्रोत्सव याहीवर्षी रद्द…

भाविकांना मुख दर्शनासाठी मंदिर खुले …

निफाड प्रतिनिधी– (रामभाऊ आवारे)

अठरापगड समाजाची
कुलदेवता म्हणून प्रसिद्ध
असलेल्या ५२ शक्तिपीठांपैकी
एक शक्तीपीठ असलेल्या श्री
क्षेत्र खेडे तालुका निफाड येथील
हिंगलाज मातेच्या नवरात्रोत्सवात
अत्यंत साध्या पद्धतीने प्रारंभ
करण्यात आला असल्याची
माहिती हिंगलाज देवी माता मंदिर
खेडे ता निफाड यांनी दिली आहे.
सकाळी सहा वाजता नैमित्तिक
पूजेप्रमाणे पौराहित्य हर्षद गुरु,
अविनाश गुरु, व अनिरुद्ध गुरु या
तीनही पंगे भावंडांनी षोडशोपचार
पूजा करून हिंगलाज माता
मंदिराच्या गाभाऱ्यात सजावट
केली. सकाळी सहा वाजता
हिंगलाज मातेची नैवेद्यपूजा देवी मंदिराची पौराहित्य विष्णुपंत हर हर पंगे गुरुजी तसेच अनिरुद्ध पंगे, अविनाश पंगे,हर्षद पंगे गुरुजी. खेडे यांनी पुजेसाठी विशेष सहकार्य केले.
त्यानंतर देवी मंदिरात ठाकुर ज्वेलर्स चे मुख्य संचालक शंकरराव काशिनाथ ठाकुर यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. ध्वजपुजन हरेकृष्ण बाबांची मुख्य अनुयायी सुजित महाराज देवरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले व ध्वजारोहण खेडे (हिंगलाजनगरचे) सरपंच श्री व सौ निवृत्ती कोल्हे सर यांनी केले.सकाळी ७.३० ला ट्रस्टचे अध्यक्ष शंकरराव कोल्हे व पदाधिकाऱ्यांनी रथपूजन केले. सकाळी आठ
वाजता शंकरराव काशिनाथ ठाकूर
यांच्या हस्ते महापूजा करण्यात
आली. यावेळी श्रीक्षेत्र देवरगाव
ता.चांदवड येथील हरेकृष्ण
बाबांची मुख्य अनुयायी योगीराज
सुजित महाराज यांनी सदिच्छा
भेट देऊन दर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे येवला
तालुका अध्यक्ष तथा अध्यात्मिक
कार्यात सदैव अग्रेसर असणारे
विठ्ठल अण्णा शेलार यांनी देवीला नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी डिपाॅझीट रक्कमेतून
दहा दिवसांची वस्त्रे दान करून
विधिवत पूजा केली.भाविकांना
नवरात्र काळामध्ये दर्शन घेता यावे यासाठी मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली असून नवरात्र काळामध्ये मराठी बसणे मिरवणूक विसर्जन धार्मिक कार्यक्रम यात्रा शासनाचे नियम पाळत बंद करण्यात आलेली आहे.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष शंकरराव कोल्हे, सरचिटणीस नामदेव जाधव, चिटणीस त्रंबक जेऊघाले, खजिनदार साहेबराव गायकवाड, सदस्य रामदास त्र्यंबक कोल्हे, शिवराम शंकर कोल्हे, प्रभाकर म्हसुजी मेधने, माधव दत्तात्रेय रोडे, राजाराम पारधे, अनिल गवळी,देवी मंदिर पौराहित्य विष्णुपंत पंगे गुरुजी, अनिरुद्ध पंगे, अविनाश पंगे, हर्षद पंगे आदींसह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते.तरी हिंगलाज देवी माता मंदिर ट्रस्टच्या वतीने ऑनलाईन सुविधा
करण्यात आली असल्याची माहिती ट्रस्ट चे अध्यक्ष तथा
रासाकाचे मा चेअरमन शंकरराव कोल्हे यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!