भिंगार शहरात नेहरू मार्केटला भीषण आग .
नगर प्रतिनिधी –
नगर येथील छावणी परिषद हद्दीतील भिंगार शहरामधील नेहरू मार्केटला आज शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याने चोवीस पैकी साधारण पंधरा दुकाने आगीत भस्मसात झाल्याची प्राथमिक माहिती असून व्यापारी व दुकानदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे.ऐन सणासुदीला अशी घटना घडल्याने व्यापारी वर्गावर एक प्रकारे संकट कोसळले आहे.आग विजवण्या कामी अहमदनगर महानगरपालिका, एमआयडीसी, राहुरी, व्हीआरडी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत केली.आ.संग्राम जगताप यांनीही भिंगार येथील नेहरू मार्केटला आग लागल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाला तातडीने घटनास्थळी पोहचण्यासाठी सूचना दिल्या.
घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सोनवणे मॅडम,शहरातील तोफखाना कोतवाली नगर तालुका पेट्रोलिंग मोबाईल ,आर सी पी हजर होते. यांच्या बरोबर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अजी-माजी सदस्य, अधिकारी, कर्मचारी आल्याने त्यांच्या मदतीने होणारी जीवितहानी टळली.
(sagar salve)
मान. संपादक साहेब कृपया प्रसिद्धी साठी.