फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोविरोधातील बलात्काराचा खटला बंद करण्याची न्यायाधीशांची शिफारस
वॉशिंग्टन,
अमेरिकन न्यायाधीशाने स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो विरुद्ध सुरु असलेला बलात्काराचा खटला निकाली काढण्याची शिफारस केली आहे. लॉस वेगस स्थित एका हॉटेलमध्ये माजी मॉडेल कॅथरीत मायोर्गा हीने 2009 मध्ये रोनाल्डोवर बलात्काराचे आरोप केले होते. पण ख्रिस्तियानो रोनाल्डोने या आरोपांचे खंडन केले आहे. जे काही झाले ते दोघांच्या संमतीने झाल्याचे रोनाल्डोचे म्हणणे आहे. पण असे असले तरी रोनाल्डो विरुद्ध कॅथरीन मायोर्गा हिने तक्रार दाखल केली होती.
2010 मध्ये न्यायालयाबाहेर प्रकरण सोडवल्याचा दावाही मायोर्गा हिने केला होता. रोनाल्डोने मायोर्गाला जवळपास 2.81 कोटी रुपये दिले होते. तसेच याबाबत पुन्हा कधीच वाच्यता करणार नाही, अशी हमी घेतली होती. पण मायोर्गाने पैसे घेतल्यानंतरही लास वेगासमध्ये खटला दाखल केला. तसेच मानसिकदृष्ट्या ठिक नसताना अटी मान्य केल्याचे सांगितले. मायोर्गाने त्याचबरोबर जवळपास 420 कोटी रुपयांची मागणी केली होती. 2018 मध्ये मी टू मुव्हमेंटने प्रेरित होत रोनाल्डोविरोधात आवाज उचलला होता. मॅनचेस्टर युनाइटेडच्या स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोला दोन वर्षापूर्वी या प्रकरणातून दिलासा देण्यात आला होता.
दंडाधिकारी न्यायाधीश डॅनियल अलब-ेगेटस यांनी खटल्याच्या सुनावणी दरम्यान रोनाल्डोचा खटला बंद करण्याची शिफारस केली आहे. आता स्वतंत्र न्यायाधीशांकडून न्यायाधीश अल्ब-ेगेटच्या शिफारशीचे पुनरावलोकन केले जाणार आहे. या शिफारसीचे रोनाल्डोचे वकील पीटर क्रिस्टियनसन यांनी स्वागत केले.