गो.पु.पाटील महाविद्यालयात साधनाई स्पर्धा-परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न….
भडगाव – तालुका प्रतिनिधी – ( राजू दिक्षित )
कोळगाव ता.भडगाव – कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील कनिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा-परीक्षेची तयारी करणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्थापीत करण्यात आलेल्या साधनाई स्पर्धा-परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील तसेच एरंडोल नगरपरिषदेचे लेखाधिकारी शरद राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण भागातील गरीब होतकरु तसेच हुशार विद्यार्थांचा विचार करुन त्यांनी भविष्यात उच्च पदावर नोकरी प्राप्त करुन,स्वतःचे,कुटूंबाचे नाव करावे तसेच समाजात त्यांना मान सन्मान मिळावा ह्या उद्देशाने महाविद्यालयातर्फे प्राचार्य सुनिल पाटील यांच्या संकल्पनेतून विनामूल्य साधनाई स्पर्धा-परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचा मानस त्यांनी महाविद्यालयात व्यक्त केला त्यास महाविद्यालयातील इतरांनी मूर्त स्वरुप देण्याचे ठरवून केंद्र सुरु करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून १५ वर्षे पोलिस दलात सेवा बजावणाऱ्या तसेच नुकतीच प्रशासकीय एम.पी.एस.सी.ची परीक्षा देऊन लेखाधिकारी शरद राजपूत उपस्थित होते.वक्त्यांनी स्पर्धा परिक्षेस सामोरे जाताना कशारितीने अभ्यास करावा याचे अनमोल मार्गदर्शन करतानाच स्पर्धा परीक्षेला खुप महत्त्व आले असून अचूकपणे अभ्यास केल्यास हमखास यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही याची जाणीव वक्ते शरदराव राजपूत यांनी उपस्थित विद्यार्थांना करुन दिली.
कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून स्थानिक स्कुल कमेटीचे युवराज पाटील,संजय पाटील,संभाजी पाटील आदि उपस्थित होते.महाविद्यालयाच्या या नाविण्यपुर्ण उपक्रमाचे प्रेरणास्रोत असलेले चेअरमन प्रतापराव पाटील,संस्थेच्या सचिव डॉ.पुनम पाटील तसेच मंत्रालयातील अव्वर सचिव प्रशांतराव पाटील यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
प्राचार्य सुनिल पाटील, पर्यवेक्षक ए.एच.पवार,कनिष्ठ महाविद्यालयीन कार्यवाहक प्रा.आर.ए.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नरेंद्र भोसले,सुत्रसंचालन प्रा.प्रशांत पाटील,आभार प्रा.सोनाली सोनवणे तर छायाचित्रण प्रा.मनोज पवार यांनी केले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.
______________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण भडगाव तालुक्यातील बातमी 9730002081 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
राजू दिक्षित
भडगाव तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9730002081