एअर इंडियाच्या खरेदीनंतर रतन टाटांनी केले ’हे’ टिवट

नवी दिल्ली,

टाटा सन्सकडून एअर इंडियाची खरेदी करण्यात आल्यानंतर टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांनी एक टिवट करत एअर इंडियाचे स्वागत केले आहे. ‘वेलकम बॅक, एअर इंडिया‘ असे टिवट रतन टाटांनी करत एअर इंडियाचे समूहात पुन्हा स्वागत केले आहे.

ठपुन्हा स्वागत आहे, एअर इंडिया‘ असे टिवट करत त्यासोबत एक मजकुर असलेला फोटो टाटांनी टिवट केला आहे.

ठटाटा ग-ुपने एअर इंडियाच्या अधिग-हणाची बोली जिंकल्याचे वृत्त नक्कीच चांगले आहे. यासोबतच एअर इंडियाच्या पुनर्बांधणीसाठीही लक्षणीय प्रयत्न करावे लागणार आहेत. हवाई उद्योगक्षेत्रात टाटा ग-ुपच्या अस्तित्वासाठीही मजबूत बाजार संधी यामुळे उपलब्ध होणार आहेत.

जेआरडी टाटांच्या नेतृत्वात एअर इंडियाने जगातील सर्वात प्रतिष्ठित एअरलाईन्सचा नावलौकिक मिळविला होता. हा नावलौकिक पुन्हा मिळविण्याची संधी आता टाटाकडे आहे. जेआरडी जर आज हयात असते, तर त्यांनाही यामुळे खूप आनंद झाला असता.

केंद्र सरकारने काही निवडक उद्योग हे खासगी क्षेत्रासाठी खुले केल्याच्या धोरणाचेही आम्ही स्वागत करतो.

पुन्हा स्वागत आहे, एअर इंडिया.‘

असा मजकुर असलेला एक फोटोही टाटांनी यासोबत जोडला आहे. याच्या खाली एअर इंडियाच्या एका विमानातून खाली उतरणार्‍या एअर होस्टेससह जेआरडी टाटा हात उंचावून अभिवादन करत असल्याचा फोटोही जोडण्यात आला आहे.

अनेक शक्यतांच्या पार्श्वभूमीवर अखेर एअर इंडियाची मालकी टाटांकडेच येणार यावर शुक्रवारी अधिकृत शिक्कामोर्तब झाले. टाटा सन्सने एअर इंडियाच्या खरेदीसंदर्भातील बोली जिंकली असून आता एअर इंडिया ही पुन्हा एकदा टाटांकडे आल्याचे दिसून येत आहे. तब्बल 18 हजार कोटींमध्ये टाटा सन्सने एअर इंडियाची खरेदी केली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!